Advertisement

जयंत पाटलांनी किंग खानला का झापलं? वाचा...

बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुखचा वाढदिवस काही दिवसांपूर्वीच झाला. वाढदिवासाला फॅन्स आणि सहकारी कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना शाहरूखला दुसऱ्या बाजूला मात्र आ. जयंत पाटील यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं.

जयंत पाटलांनी किंग खानला का झापलं? वाचा...
SHARES

‘असशील तू कोणीही मोठा स्टार, म्हणून काय संपूर्ण अलिबाग खरेदी केलंस का?, माझ्या परवानगीशिवाय तू येऊ शकत नाही अलिबागला.’ अशा कडक शब्दांत शेतकरी कामगार पक्षाचे नेते आ. जयंत पाटील यांनी शाहरुख खान खानला नुकतंच सुनावलं.

बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुखचा वाढदिवस काही दिवसांपूर्वीच झाला. वाढदिवासाला फॅन्स आणि सहकारी कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना शाहरूखला दुसऱ्या बाजूला मात्र आ. जयंत पाटील यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं.


का भडकले पाटील?

शाहरुख खान वाढदिवसानिमित्त पार्टी करायला अलिबागच्या फार्म हाऊसवर गेला होता. ३ नोव्हेंबरला तो अलिबागहून बोटीने गेट-वे ऑफ इंडियाला आला. यावेळी गेट-वेवर त्याच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली. नेमकी याचवेळी जयंत पाटील यांची बोट मुंबईहून अलिबागच्या दिशेनं निघाली होती. पण शाहरुखची बोट पार्क होईपर्यंत पाटलांना वाट पाहावी लागली. यांत बराच वेळ वाया गेला. 

त्यामुळे पाटलांचा पारा चांगलाच चढला. त्यानंतर त्यांनी 'असशील तू मोठा स्टार, म्हणून काय संपूर्ण अलिबाग खरेदी केलं काय?', अशा शब्दांत शाहरुखला त्याच्या चाहत्यांसमोरच सुनावलं. विशेष म्हणजे या संभाषणाचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.



शाहरुख मात्र गप्पच

पाटील यांनी शाहरुखच्या बोटीसमोर स्वत:ची बोट नेली आणि त्याला चार शब्द सुनावले. यावेळी शाहरुख बोटीतच होता. तो बाहेर आला नाही किंवा कोणतंही उत्तर दिलं नाही. पाटील निघून गेल्यावर मात्र तो बोटीतून बाहेर आला. त्यावेळी चाहत्यांनी त्याचं जोरदार स्वागत करत जल्लोष केला.


...म्हणून मी त्याला झापलं  

मी जेव्हा अलिबागला बोटीनं जाण्यासाठी गेट वे ऑफ इंडियाजवळ निघालो. त्यावेळी तिथं प्रचंड गर्दी होती. तिथं पोलीस फौजफाटाही होता. ते तिथल्या लोकांना मागे लोटत होते. नंतर मला समजलं की, शाहरुख खान तिथल्या बोटीत बसला आहे. त्यावेळी तिथल्या पोलिसांनी मलाही मागे लोटलं. पण तेथील एका पोलिसानं मला ओळखलं आणि पुढे येण्यास सांगितलं. मी पुढे आलो तेव्हा मला शाहरुख बोटीत सिगरेट ओढताना दिसला. तिथूनच तो चाहत्यांना हातही करत होता. तो तिथे जवळजवळ अर्धा तास होता. एकीकडे लोकांना बोटीनं जाण्यास उशीर होत असताना दुसरीकडे पोलीस शाहरुखला संरक्षण देण्यात व्यस्त होते. त्यामुळेच मी त्याला तिथं सुनावलं. मी स्वत: शाहरुखचा चाहता आहे. पोलीस संरक्षण देण्याबाबत माझा आक्षेप नाही. पण त्यावेळी त्याचं वर्तन चुकीचं होतं. लोकांचा खोळंबा होत होता.

- आ. जयंत पाटील  

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा