Advertisement

तुम्ही हिंदुत्व का सोडलं एवढंच सांगा, फडणवीसांचा शिवसेनेला टोला

हिंदुत्व कोणाचीच मक्तेदारी असू शकत नाही. हिंदुत्व जगावं लागतं. हिंदुत्व ही आमचीही मक्तेदारी नाही, पण तुम्ही हिंदुत्व का सोडलं एवढंच सांगावं, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला.

तुम्ही हिंदुत्व का सोडलं एवढंच सांगा, फडणवीसांचा शिवसेनेला टोला
SHARES

हिंदुत्व कोणाचीच मक्तेदारी असू शकत नाही. हिंदुत्व जगावं लागतं. हिंदुत्व ही आमचीही मक्तेदारी नाही, पण तुम्ही हिंदुत्व का सोडलं एवढंच सांगावं, असा प्रश्न विचारत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना टोला लगावला आहे. 

शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या धर्मनिरपेक्षतावादी पक्षांसोबत आघाडी करून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार बनवलं. तेव्हापासून शिवसेनेवर सातत्याने हिंदुत्वाला तिलांजली दिल्याचा आरोप विरोधी पक्ष भाजपकडून होत आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरे यांना ‘लोकसत्ता’च्या वर्धापन दिन कार्यक्रमात प्रश्न विचारण्यात आला हाेता. त्यावर हिंदुत्वाची मक्तेदारी काही भाजपकडे नाही. देशातील सद्य:स्थिती पाहता लोकांना आता पर्याय हवा असल्याचं दिसतं. जनता पर्याय शोधू लागते तेव्हा तो निर्माणही होतो, असं सूचक वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं होतं.

हेही वाचा- शरजीलला पळून जाण्यात ठाकरे सरकारची मदत, आशिष शेलारांचा गंभीर आरोप

त्याला प्रत्त्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) म्हणाले, हिंदुत्व कोणाचीच मक्तेदारी असू शकत नाही. हिंदुत्व जगावं लागतं. नुसतं भाषणातून बोलून चालत नाही. ज्यावेळी हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे जनाब बाळासाहेब होतात आणि ज्यावेळी शिवगान स्पर्धा बंद होऊन अजान स्पर्धा सुरु होते, तेव्हा अशा प्रकारची वक्तव्य करावी लागतात. म्हणून कदाचित त्यांनी हे वक्तव्य केलं असावं. हिंदुत्व आमची देखील मक्तेदारी नाही, पण तुम्ही हिंदुत्व का सोडलं एवढंच सांगावं, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीविरोधात शिवसेनेने (shiv sena) राज्यव्यापी आंदोलन करण्याचं ठरवलं आहे, त्यावर भाष्य करताना, शिवसेनेनं मोर्चे काढण्याची नौटंकी करु नये. आम्ही सरकारमध्ये असताना देखील पेट्रोल-डिझेल दरवाढ झाली होती. पण त्यावेळी मी आणि सुधीर मुनगंटीवार यांनी पेट्रोल-डिझेलवरील राज्याचा कर कमी करून पेट्रोल डिझेल २ रुपयांनी स्वस्त केलं होतं. यामुळे महाराष्ट्राचं एका रुपयाचंही नुकसान झालं नव्हतं. आताच्या सरकारने देखील पेट्रोल डिझेलवरील कर कमी करून भाव नियंत्रणात आणावे, असा सल्ला देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

महाराष्ट्रात ज्या प्रकारे लोकांना वीज बिलाचं कनेक्शन तोडण्याच्या नोटिसा राज्य सरकारने पाठवल्यात ते पाहता राज्यात मोगलाई आल्यासारखा प्रकार सुरू आहे. याविरोधात आम्ही आंदोलन करणार असल्याचंही फडणवीस म्हणाले.

(maharashtra opposition leader devendra fadnavis slams cm uddhav thackeray over hindutva)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा