Advertisement

देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती, आरेतच करा मेट्रो कारशेड

प्रश्न श्रेयाचा नाही, तर मुंबईकरांच्या सोयी-सुविधेचा आहे! श्रेयासाठी काम करणं हा भाजपचा स्वभाव नाही. मुंबईकरांनी आधीच खूप भोगलं आहे, त्यांना आणखी त्रास नको. हा प्रश्न वैयक्तिक प्रतिष्ठेचा करू नका, ही हात जोडून विनंती आहे!

देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती, आरेतच करा मेट्रो कारशेड
SHARES

प्रश्न श्रेयाचा नाही, तर मुंबईकरांच्या सोयी-सुविधेचा आहे! श्रेयासाठी काम करणं हा भाजपचा स्वभाव नाही. मुंबईकरांनी आधीच खूप भोगलं आहे, त्यांना आणखी त्रास नको. हा प्रश्न वैयक्तिक प्रतिष्ठेचा करू नका, ही हात जोडून विनंती आहे! असं म्हणत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो कारशेडच्या (mumbai metro) प्रश्नावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आवाहन केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना कारशेडबाबतची भूमिका मांडली. त्यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) म्हणाले, प्रश्न श्रेयाचा नाही, तर मुंबईकरांच्या सोयी-सुविधेचा आहे! श्रेयासाठी काम करणं हा भाजपाचा स्वभाव नाही. पण प्रश्न अपश्रेयाचा जरूर आहे, ते तुमच्या वाट्याला येऊ नये, हीच इच्छा! भविष्यात कोणतीही अतिरिक्त जागा कारशेडसाठी लागणार नसताना दिशाभूल कशाला? या समितीनेच सांगितले की कांजूरमार्ग येथे कारशेड नेल्यास किती मोठे आर्थिक नुकसान होईल. शिवाय ४ वर्षांचा विलंब वेगळा कांजूरमार्ग इथं कारशेड करायचं असेल तरीसुद्धा आरेमध्ये बांधकाम करावंच लागेल हे का लपवून ठेवता?

बोगदे तयार करण्याचं काम आरेची जागा डोळ्यापुढे ठेवून करण्यात आलं आहे आणि ते जवळजवळ ८०%पूर्ण होत आहे. आता दुसरी कोणतीही जागा निवडली तरी पैसा व वेळ दोन्ही वाया जाणार! मुंबईकरांनी आधीच खूप भोगले आहे, त्यांना आणखी त्रास नको. हा प्रश्न वैयक्तिक प्रतिष्ठेचा करू नका, ही हात जोडून विनंती आहे!

हेही वाचा- होय, मुंबईकरांच्या हितासाठी मी अहंकारी- उद्धव ठाकरे

मेट्रो प्रकल्पात राज्य सरकारइतकाच निधी केंद्र सरकारचा सुद्धा आहे. केंद्राच्या मदतीने JICAने या प्रकल्पाला वित्तपुरवठा केला आहे. मुंबईकरांच्या हितासाठी केंद्र सरकारने यापूर्वीसुद्धा महाराष्ट्राला सहकार्य करण्याची भूमिका घेतली; यापुढेसुद्धा सहकार्याचीच भूमिका केंद्र सरकारची असेल!

आरेच्या जागेला मा. सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. आरेची जागा अंतिम झाल्यानंतर काम सुद्धा बरेच पुढे गेले आणि १०० कोटी रुपयांचा खर्चही झाला. लोकशाहीत चर्चेला आमची कायमच तयारी असते आणि चर्चेतून मार्गही निघतो. मनात शंका असेल तर आज आरे कारशेडला जी जागा दिली, त्यापेक्षा एक इंच जास्त जागा भविष्यात दिली जाणार नाही, असा निर्णय करा, आम्ही त्याला पाठिंबा देऊ. आमची एकच विनंती आहे की, आता दुराग्रह सोडून द्यावा आणि मुंबईकरांच्या हितासाठी आरेच्या जागेवर कारशेडचा मार्ग तत्काळ प्रशस्त करावा, असं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना उद्देशून म्हणाले.

तर, तर, माझं विरोधी पक्षाला आवाहन आहे "चला, या... आम्ही तुम्हाला याचं श्रेय द्यायला तयार आहोत. कांजूरचा (kanjurmarg) प्रकल्प तुम्हालाही माहिती आहे. तुम्ही हा प्रश्न सोडवा, कारण हा प्रश्न एकत्र चर्चेला बसलो तरी सुटू शकतो." इथं माझ्या इगोचा विषय नाही आहे आणि तुमच्याही असता कामा नये.

केंद्राचे कोणतेही प्रकल्प येतात तेव्हा आपण खळखळ न करता जागा देतो मग भले ही जमीन केंद्राची असेल नसेल हा वाद आपण सोडू शकतो. तिथे बिल्डर गेलेले आहेत. वाद आहे म्हणून जागा सोडून द्यायची? मग वाद सोडवणार कोण? कोणाच्या घश्यात ही जागा जाणार? बिल्डरच्या?

त्या पेक्षा केंद्राने आणि राज्याने जर एकत्र बसून हा वाद सोडवायला हवा. आपण ही राज्याची जागा, जनतेची जागा जनतेच्याच उपयोगात आणू इच्छित असू तर त्यावरून खेचाखेची कशाला? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना केला होता.

(maharashtra opposition leader devendra fadnavis urge cm uddhav thackeray to build metro car shed in aarey)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा