Advertisement

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची कोरोनावर मात

शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची कोरोनावर मात
SHARES

शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. जनतेचे प्रेम व सर्वांच्या शुभेच्छांबरोबरच या काळात योग्य आहार, योग, प्राणायाम, ध्यानधारणा आणि वाचन यामुळे लवकर बरे होण्यास मदत झाली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. (maharashtra school education minister varsha gaikwad tested covid 19 negative)

मराठवाडा मुक्ती दिन कार्यक्रमानिमित्ताने १५ ते १७ सप्टेंबर या कालावधीत त्या नांदेड, परभणी व हिंगोली या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर होत्या. या दरम्यान त्यांना संसर्ग झाला. २१ सप्टेंबर रोजी त्यांना ताप आल्यामुळे कोविड-१९ ची टेस्ट करुन घेतली असता अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांनी ब्रीच कॅण्डी इस्पितळात दाखल होऊन औषधोपचार घेतले. २८ सप्टेंबर रोजी त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

हेही वाचा- गरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण

कोविड -१९ चे निदान झाल्यानंतर योग्य ते उपचार घ्यावेत, सकारात्मक भावना ठेऊन ध्यानधारणा करावी. तसंच आपल्यामुळे इतरांना प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घ्यावी. असं आवाहन प्रा. गायकवाड यांनी केलं आहे. काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड या मुंबईतील धारावी विधानसभा मतदार संघाचं प्रतिनिधीत्व करतात.  

काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. याबाबत खुद्द एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली होती. जलसंपदा आणि शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचीही कोरोनाची पॉझिटिव्ह चाचणी आली होती.

तर ठाकरे सरकारमधील जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, अस्लम शेख, बाळासाहेब पाटील, सुनील केदार, अब्दुल सत्तार आणि विश्वजित कदम हे सर्व मंत्री बरे होऊन घरी परतले आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा