Advertisement

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण

शिवसेनेचे दिग्गज नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण
SHARES

शिवसेनेचे दिग्गज नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत खुद्द एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे. सध्या ते घरातच क्वारंटाईन झाले आहेत.

'काल मी माझी कोविड-19 ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची कोव्हीड चाचणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, ही विनंती...' असं एकनाथ शिंदे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

कोविड 19 चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर एकनाथ शिंदे यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सध्या होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे. गेले काही दिवस एकनाथ शिंदे सातत्याने कोविड 19 केअर हाँस्पिटलमध्ये पीपीई कीट घालून पहाणी करत होते. त्यामुळे त्यांना कोविड 19 चा संसर्ग झाल्याची शक्यात व्यक्तं केली जात आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवर यासंदर्भात माहिती दिली होती.

“आज माझ्या तपासणी दरम्यान मी कोरोनाव्हायरससाठी सकारात्मक चाचणी केली आहे. सर्वांचा आशीर्वाद पाठिशी आहे. त्यामुळे माझी प्रकती ठिक आहे. माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकानं सावधगिरी बाळगत चाचणी करावी. सुरक्षित राहा. काळजी घ्या., असं ट्विट वर्षा गायकवाड यांनी केलं.

आतापर्यंत, महाविकास आघाडी (MVA) सरकारमधील १२ कॅबिनेट मंत्र्यांनी कोरोनाव्हायरससाठी सकारात्मक चाचणी केली आहे. नऊ जण त्यातून बरे झाले आहेत.

नुकतेच, महाराष्ट्रातील जलसंपदा आणि शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनाही कोरोना झाल्याचं समोर आलं. यासोबतच राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचीही कोरोनाची पॉझिटिव्ह चाचणी आली.

तत्पूर्वी उद्धव ठाकरे सरकारनं जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, अस्लम शेख, बाळासाहेब पाटील, सुनील केदार, अब्दुल सत्तार आणि विश्वजित कदम यांना देखील कोरोना झाला होता. पण हे सर्व मंत्री बरे होऊन घरी परतले.हेही वाचा

गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्र, दसरा साधेपणानं साजरा करा - मुख्यमंत्री

कंगना आॅफिस तोडफोड प्रकरणात प्रतिवादी बनवणं हास्यास्पद- राऊत

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement