Advertisement

कंगना आॅफिस तोडफोड प्रकरणात प्रतिवादी बनवणं हास्यास्पद- राऊत

कंगना आॅफिस तोडफोड प्रकरणात मला प्रतिवादी बनवण्याचा प्रकारच मुळात हास्यास्पद आहे, असा टाेला, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कंगना रणौतला लगावला आहे.

कंगना आॅफिस तोडफोड प्रकरणात प्रतिवादी बनवणं हास्यास्पद- राऊत
SHARES

एकाबाजूला बेकायदेशीर बांधकाम तोडलं म्हणून कांगावा करायचा आणि मला त्यात ओढायचं हे राजकारण नाही, तर दुसरं काय आहे? कंगना आॅफिस तोडफोड प्रकरणात मला प्रतिवादी बनवण्याचा प्रकारच मुळात हास्यास्पद आहे, असा टाेला, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कंगना रणौतला लगावला आहे. (shiv sena mp sanjay raut reaction on bmc and kangana ranaut issue)

कंगनाचं कार्यालय हे बेकायदेशीर होतं. तिचं बेकायदेशीर बांधकाम तोडलं म्हणून सध्या जो कांगावा सुरू, तो कांगावा करणाऱ्यांनी एक लक्षात घ्यावं की, बेकायदेशीर बांधकाम झालं असेल तर ते तोडण्याचे अधिकार बीएमसीला आहेत. कारण बीएमसी एक स्वतंत्र संस्था आहे. नियमाचं उल्लंघन करणारं बांधकाम तोडायचं की नाही हे आम्ही ठरवू शकत नाही.

हेही वाचा- राजकारणात जाण्यासाठीच ‘त्यांच्या’कडून महाराष्ट्राची बदनामी- संजय राऊत

तेव्हा या खटल्यात मला प्रतिवादी करण्याचा प्रकार हास्यास्पदच आहे. शिवाय यामागे राजकारण देखील आहे. आम्ही बाळासाहेबांच्या हाताखाली घडलो आहोत. माझ्यावर १६० खटले आहेत. आम्हाला न्यायालयाची लढाई नवी नाही. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी कोणतीही लढाई लढण्यास आम्ही तयार आहोत, असं एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. 

शिवाय बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सातत्याने महाराष्ट्र आणि पोलिसांवर टीका केली. राजीनामा देऊन पांडे बिहार विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ते सर्वांनाच अपेक्षित होतं. राजीनामा देण्याची ही त्यांची पहिली वेळ नाहीय. जे लोक महाराष्ट्राला बदनाम करत आहेत ते राजकारणात जात आहेत. हा प्रकार महाराष्ट्राला सुनियोजीतपणे बदनाम करण्यासाठीच असल्याचा, दावा देखील संजय राऊत यांनी केला. 

हेही वाचा- कंगना आॅफिस तोडफोड प्रकरण: संजय राऊतही ओढले गेले खटल्यात


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement