Advertisement

राजकारणात जाण्यासाठीच ‘त्यांच्या’कडून महाराष्ट्राची बदनामी- संजय राऊत

जे, महाराष्ट्र, मुंबईबद्दल बोलताहेत त्यांचं पुढचं पाऊल राजकारणात पडत आहे. त्यासाठी महाराष्ट्र, मुंबईला पायपुसणं म्हणून ते वापरत असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला.

राजकारणात जाण्यासाठीच ‘त्यांच्या’कडून महाराष्ट्राची बदनामी- संजय राऊत
SHARES

गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि महाराष्ट्राला बदनाम करायचं सुनियोजित षडयंत्र रचलं जात आहे. जे, महाराष्ट्र, मुंबईबद्दल बोलताहेत त्यांचं पुढचं पाऊल राजकारणात पडत आहे. त्यासाठी ते महाराष्ट्र, मुंबईला पायपुसणं म्हणून वापरत असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. (shiv sena mp sanjay raut reacts on bihar ex dgp gupteshwar pandey quits job for contest assembly election)

बिहार विधानसभा निवडणुका तोंडावर असताना बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच घेतलेली स्वेच्छानिवृत्ती चांगलीच चर्चेत आली आहे. याप्रकरणावर संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय राऊत म्हणाले, बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सातत्याने महाराष्ट्र आणि पोलिसांवर टीका केली. राजीनामा देऊन पांडे बिहार विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ते सर्वांनाच अपेक्षित होतं. राजीनामा देण्याची ही त्यांची पहिली वेळ नाहीय. जे लोक महाराष्ट्राला बदनाम करत आहेत ते राजकारणात जात आहेत. हा प्रकार महाराष्ट्राला सुनियोजीतपणे बदनाम करण्यासाठीच असल्याचा, दावा संजय राऊत यांनी केला. 

हेही वाचा - कंगना आॅफिस तोडफोड प्रकरण: संजय राऊतही ओढले गेले खटल्यात

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात गुप्तेश्वर पांडे यांनी मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. सोबतच बिहारचे पोलीस अधिकारी तपास करण्यासाठी मुंबईत आल्यावर जेव्हा त्यांना महापालिकेतर्फे क्वारंटाईन करण्यात आलं, तेव्हा पांडे यांनी मुंबई महापालिकेसोबतच सत्ताधाऱ्यांवरही जाहीररित्या आगपाखड केली होती. रिया चक्रवर्तीच्या बाबतीत माध्यमांमध्ये अपशब्द वापरल्यामुळेही ते चर्चेत होते.

गुप्तेश्वर पांडे हे बिहारमधील १९८७ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. पांडे यांनी २००९ सालीही लोकसभा निवडणूक लढण्यासाठी पोलीस दलाच्या सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. यानंतर बिहार विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी पांडे पुन्हा स्वेच्छानिवृत्ती घेतील अशी चर्चा बिहारमध्ये मागील बऱ्याच महिन्यांपासून सुरु होती. पांडे बक्सर विधानसभेच्या जागेवरुन निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून (रालोआ-एनडीए) पांडे यांना तिकीट देण्यात येईल, असं म्हटलं जात आहे. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा