Advertisement

शिंदे गटाकडून आदित्य ठाकरे लक्ष्य, व्यंगचित्राच्या बॅनरसह घोषणाबाजी

मागील दोन दिवसांपासून शिंदे गटाने मातोश्री आणि ठाकरे कुटुंबाला लक्ष्य केले आहे.

शिंदे गटाकडून आदित्य ठाकरे लक्ष्य, व्यंगचित्राच्या बॅनरसह घोषणाबाजी
SHARES

विधीमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिंदे गटाच्या (Shivsena rebel mla) आमदारांनी थेट शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनाच लक्ष्य केले.

शिंदे गटाच्या आमदारांनी विधीमंडळांच्या पायऱ्यावर आदित्य ठाकरे यांचे घोड्यावर उलट्या दिशेने बसलेल्या व्यंगचित्राचे बॅनर झळकावत घोषणाबाजी केली. घोड्याचे तोंड हिंदुत्वाच्या दिशेने असून आदित्य यांचे तोंड महाविकास आघाडीकडे असल्याचे दाखवण्यात आले.

वर्ष 2014 मध्ये 151 चा हट्ट करत युती बुडवली, 2019 मध्ये खुर्चीसाठी हिंदुत्वाची विचारधारा पायदळी तुडवली अशी घोषणा करण्यात आली.

आम्ही मातोश्री आणि ठाकरे कुटुंबावर टीका करणार नसल्याचे वारंवारपणे शिंदे गटाकडून सांगण्यात येत होते. मात्र, मागील दोन दिवसांपासून शिंदे गटाने मातोश्री आणि ठाकरे कुटुंबाला लक्ष्य केले आहे.

विधीमंडळ अधिवेशनात शिवसेना आणि महाविकास आघाडीत संघर्षाची ठिणगी पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता. विधीमंडळ अधिवेशन सुरू झाल्यानंतर महाविकास आघाडीकडून शिंदे गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती. त्यानंतर बुधवारपासून शिंदे गटानेही महाविकास आघाडी आणि विशेषत: शिवसेनेविरोधात घोषणाबाजी सुरू केली.

बुधवारी शिंदे गटातील आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात बाचाबाचीदेखील झाली होती.

पर्यटन खाते घेऊन घरातच बसून केला कहर, सत्ता गेल्यावर पर्यटनाची आली कहर, पुन्हा निवडणूक लढवण्याची देतात ठसन, स्वत: आमदार व्हायला महापौर आणि दोन MLC चे लागते कुशन, खुर्चीवर बसल्यावर शिवसैनिकाला केले तडीपार, सत्ता गेल्यावर फिरतात दारोदार, युवराजांची 'दिशा' नेहमीच चुकली अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या.



हेही वाचा

मुंबई महापालिका प्रभाग रचनेची लाच लुचपत प्रतिबंधक विभागमार्फत चौकशी

शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ नये म्हणूनच युती तोडली, एकनाथ खडसेंचा दावा

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा