महिलांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजप आमदार राम कदम यांच्याविरोधात राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. त्यांच्याविरोधात कारवाईची आणि राजीनाम्याची मागणी होत आहे. मात्र या सगळ्यात महिला आयोग कुठं आहे? हाच प्रश्न अनेकांना पडला होता. कारण या प्रकरणावरून इतका वाद सुरू असताना महिला आयोग शांत होतं. त्यामुळे महिला आयोगाकडूनही कारवाई व्हावी, अशी मागणी होती.
उशिरा का होईना पण महिला आयोग जागं झालं आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी बुधवारी रात्री उशिरा राम कदम यांच्याविरोधात कारवाईचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे राम कदम यांना आक्षेपार्ह विधनाबाबत पुढच्या आठ दिवसांत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती रहाटकर यांनी दिली आहे. तशी नोटीसही महिला आयोगाकडून राम कदम यांना बजावण्यात आली आहे.
महिला आयोगाकडून याबाबत सर्वात आधी कारवाई होणं अपेक्षित होतं. मात्र दोन दिवसांत महिला आयगाकडून अशी कोणतीच कारवाई झाली नाही. पण अखेर या प्रकरणाचं गांभीर्य आणि महिलांमधील रोष लक्षात घेत अखेर महिला आयोगानं या प्रकरणाची दखल घेतली आहे. आयोगानं सुमोटो दाखल करत राम कदम यांच्याकडे या आक्षेपार्ह विधानाबाबत आठ दिवसांत उत्तर मागितलं आहे.
त्यामुळे आता राम कदम यावर काय उत्तर देतात? नी त्यानंतर महिला आयोग काय भूमिका घेते? याकडे सर्वांचं लक्ष असेल. दरम्यान राम कदम यांच्या वक्त्यानंतर उफाळलेल्या वादावर एका व्हिडिओद्वारे रहाटकर यांनी या वक्तव्यावर केवळ नारजी व्यक्त केली होती.
हेही वाचा -