Advertisement

Maharashtra Assembly Election 2019- अणुशक्तीनगरमध्ये नवाब मलिक आणि तुकाराम काते यांच्यात ‘काँटे की टक्कर’!

मुंबईच्या अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे तुकाराम काते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अध्यक्ष नवाब मलिक यांच्यात मुख्य लढत होणार आहे.

Maharashtra Assembly Election 2019- अणुशक्तीनगरमध्ये नवाब मलिक आणि तुकाराम काते यांच्यात ‘काँटे की टक्कर’!
SHARES

मुंबईच्या अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे तुकाराम काते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अध्यक्ष नवाब मलिक यांच्यात मुख्य लढत होणार आहे. हा मतदारसंघ मुंबईच्या दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात येतो. 

शिवसेनेचं वर्चस्व

एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्राबल्य असलेल्या या मतदारसंघात आता शिवसेनेचं वर्चस्व आहे. येथील विद्यामान खासदार राहुल शेवाळे आणि विद्यमान आमदार तुकाराम काते दोघेही शिवसेनेचेच आहेत. नवाब मलिक यांचा मूळ कुर्ला मतदारसंघ अनुसूचित जातींकरिता राखीव झाल्यानंतर ते या मतदारसंघात आले. 


निसटता पराभव

२००९ मध्ये नवाब मलिक यांनी तुकाराम काते यांना साधारणत: ६ हजार मतांनी पराभूत केलं होतं. परंतु या पराभवाची परतफेड करत २०१४ च्या निवडणुकीत काते यांनी मलिक यांचा अवघ्या १००७ मतांनी निसटता पराभव केला. शेकापच्या एका मुस्लिम उमेदवाराने ७ ते ८ हजार मते खाल्ल्याने हा पराभव मलिक यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. मलिक या पराभवाचा वचपा काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. 

दांडगा जनसंपर्क 

या मतदारसंघात एकाबाजूला बीपीसीएल, आयपीसीएल कर्मचारी वसाहत, रहेजा कॉम्प्लेक्ससारख्या उच्च मध्यमवर्गीयांच्या वसाहती असून दुसरीकडे मानखूर्द गाव, चिता कँपसारख्या झोपडपट्ट्या हे या मतदारसंघाचे वैशिष्ट्य. पराभवानंतरही हार न मानता मागील ५ वर्षांपासून मलिक यांनी मतदारसंघाशी चांगला संपर्क ठेवला आहे. तर काते यांचाही संपर्क दांडगा आहे. त्यामुळे इथली लढत चुरशीची होणार असल्याचा अंदाज आहे. त्याशिवाय मनसेचे विजय रावराणे देखील इथून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.


  • विधानसभा मतदारसंघ क्र.— १७२
  • मतदारसंघ आरक्षण- खुला

मतदारसंख्या

  • पुरूष मतदार - १३,५६०७
  • महिला मतदार- ११,४४१२
  • तृतीयपंथी मतदार - २ 
  • एकूण मतदार- २५००२१ 

२०१४ निवडणूक

  • तुकाराम काते (शिवसेना)- ३९९६६
  • नवाब मलिक (राष्ट्रवादी)- ३८९५९
  • विठ्ठल खरटमोल (भाजप)- २३,७६७
  • राजेंद्र माहूलकर (शिवसेना)- १७,६१५


२०१९ उमेदवार

  • तुकाराम काते (शिवसेना)
  • नवाब मलिक (राष्ट्रवादी काँग्रेस)
  • विजय रावराणे (मनसे)

    हेही वाचा-


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा