Advertisement

भरती प्रक्रियेत कुणावरही अन्याय होणार नाही- नाना पटोले

इतर मागास प्रवर्गांसह अन्य मागास प्रवर्गांवर गेल्या २५ वर्षांपासून होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी भरती आणि पदोन्नतीबाबतच्या धोरणाचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करुन संविधानाने दिलेल्या अधिकारांची जपणूक व्हावी असे निर्देश नाना पटोले यांनी दिले.

भरती प्रक्रियेत कुणावरही अन्याय होणार नाही- नाना पटोले
SHARES

राज्यात सुरु असलेली उच्च शैक्षणिक सस्थांमधील भरती प्रक्रिया १०० पदांच्या बिंदूनामावलीच्या केंद्र शासनाच्या नियमावलीनुसारच राबवण्यात यावी. इतर मागास प्रवर्गांसह अन्य मागास प्रवर्गांवर गेल्या २५ वर्षांपासून होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी भरती आणि पदोन्नतीबाबतच्या धोरणाचा सूत्रबद्ध प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करुन संविधानाने दिलेल्या अधिकारांची जपणूक व्हावी असे निर्देश विधानसभा अध्यक्ष पटोले यांनी दिले. (maharashtra vidhan sabha speaker nana patole directs over recruitment in educational institution)

महाराष्ट्र शासनाच्या सरळसेवा भरतीकरीता असलेल्या १०० बिंदूनामावलीत इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या संवर्गावरील अन्याय दूर करण्यासंदर्भात नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन, मुंबई इथं बैठकीचं आयोजन करण्यात आलं. यावेळी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित होते. 

हेही वाचा - म्हणून ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय- हसन मुश्रीफ

राज्यात सुरु असलेल्या भरती आणि पदोन्नती प्रक्रियेत कोणत्याही समाजघटकावर अन्याय होता कामा नये त्याचबरोबर इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकावर अन्याय न होता शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया राबविली जावी अशा सूचनाही नाना पटोले यांनी दिल्या. पदोन्नतीत एस सी., एस टी., इतर मागासवर्ग यांच्यावर अन्याय न करता महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने दिलेल्या निर्णयानुसार कार्यवाही करण्याच्याही त्यांनी सूचना केल्या. सामान्य प्रशासन आणि विधी व न्याय विभाग यांची यासंदर्भात महत्वाची भूमिका रा‍हील. पुरोगामी विचारांची महाराष्ट्राची परंपरा लक्षात घेता कोणत्याही प्रवर्गावर अन्याय होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी, असंही विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी स्पष्ट केलं. 

सरळसेवा भरती बिंदूनामावली संदर्भात झालेल्या या बैठकीस माजी लोकसभा सदस्य, माजी विधानपरिषद सदस्य हरिभाऊ राठोड, विधानपरिषदेचे माजी सदस्य प्रकाश शेंडगे, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव  शिवाजी जोंधळे, विधी व न्याय विभागाचे सचिव तथा विधानमंडळाचे सचिव (कार्यभार) राजेंद्र भागवत  यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा - ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण- मुख्यमंत्री

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा