Advertisement

'विलेपार्लेत एव्हिएशन झोन करा'


'विलेपार्लेत एव्हिएशन झोन करा'
SHARES

महापालिका कार्यालय – विलेपार्लेतील जुन्या धोकादायक आणि पुनर्वसनासाठी रखडलेल्या इमारतीतील जनतेसाठी एव्हिएशन झोन तयार करावा, अशी मागणी मुंबई विकास आराखडा नियोजन समितीकडं करण्यात आली असल्याचं विलेपार्लेचे आमदार पराग अळवणी यांनी सांगितलं. एव्हिएशन झोन केल्यास त्या विभागाचे प्रश्न नागरिकांना मांडता येतील. तसंच इतर विकास प्रकल्पाला देण्यात येत असलेल्या सवलतींप्रमाणे या इमारतीच्या झोनला सवलत मिळावी असं अळवणी यांनी सांगितलं. महापालिका मुख्य कार्यालय इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सेझ आणि इतर इमारतींच्या प्रकल्पाप्रमाणे विलेपार्लेतील इमारतींच्या विकासासाठी शिथिलता मिळावी, तशी विकास नियंत्रण नियमावलीत तरतूद करावी अशी मागणी विलेपार्लेच्या जनतेच्यावतीनं केली असल्याचं अळवणी यांनी सांगितलं. विकास आराखड्यात घोळ झाला असल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला. विलेपार्लेत जिथं आरक्षण नाही तिथं पूल बांधण्याची गरज नाही. तसंच झोपडपट्टी वसाहत असल्यामुळं पूल बांधू नये अशी सूचना करण्यात आली असल्याचं त्यांनी म्हटलं. त्या मोकळ्या जागेचा वापर उद्यान आणि मैदानासाठी करावा, तसंच त्या झोपडीधारकांचं पुनर्वसन आणि पुनर्विकास करावा अशा सूचना विकास नियोजन समितीकडे केल्याचं अळवणी यांनी म्हटलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा