Advertisement

सर्व पक्ष एकत्र आल्यास भाजपचा सहज पराभव - ममता बॅनर्जी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

सर्व पक्ष एकत्र आल्यास भाजपचा सहज पराभव - ममता बॅनर्जी
SHARES

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक अपार्टमेंट येथील घरी दोघांची भेट झाली.

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, सर्व प्रादेशिक पक्ष एकत्र आले तर भारतीय जनता पक्षाचा सहज पराभव होऊ शकतो.

मंगळवारी ममता यांनी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांचीही भेट घेतली. या भेटीनंतर आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितले की, आम्ही त्यांचे मुंबईत स्वागत करतो. ही मैत्री आम्हाला पुढे न्यायची आहे.

ममता मंगळवारी सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. त्या रुग्णालयात दाखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही भेटणार होत्या. मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ममता यांना राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेता येणार नसल्याचं शिवसेनेनं म्हटलं.

दरम्यान, पश्चिम बंगाल ईडी आणि सीबीआयला पुरून उरला, तसाच महाराष्ट्रही पुरून उरेल, असा विश्वास ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी व्यक्त केल्याची माहिती संजय राउत यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

संजय राउत म्हणाले की, "ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात भाजपचे प्रमुख कार्यकर्ते म्हणजे, ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स, एनसीबी हे जे दहशतवाद निर्माण करत आहेत. सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशाच प्रकारचे महान कार्य हे भाजपचे कार्यकर्ते पश्चिम बंगालमध्येही करत आहेत, असं मी भेटीत दीदींना सांगितलं.

त्यावर दीदी म्हणाल्या की, आम्ही त्यांना पुरून उरलेलो आहोत आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्र देखील या दहशतवाद्यांशी सामना करेल. अशी खात्री आहे, असं ममता म्हणाल्या.



हेही वाचा

मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख

बेस्टच्या वाढीव वीज बिलासंदर्भात राज ठाकरे आक्रमक

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा