Advertisement

बेस्टच्या वाढीव वीज बिलासंदर्भात राज ठाकरे आक्रमक

आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना ग्राहकांच्या बाजूनं उभी राहिली आहे.

बेस्टच्या वाढीव वीज बिलासंदर्भात राज ठाकरे आक्रमक
SHARES

बेस्ट कंपनीकडूनही (BEST Company) ग्राहकांना वाढीव वीज बिल पाठवण्यात आल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. याप्रकरणी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना ग्राहकांच्या बाजूनं उभी राहिली आहे. यासाठी मनसे तर्फे महापालिका आयुक्तांची भेटही घेण्यात आली आहे.

मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची भेट घेतली. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray) यांनी बेस्टच्या वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर आयुक्तांना लिहिलेले पत्रही देण्यात आले आहे.

बेस्ट कंपनीनं महाराष्ट्र वीज नियामक आयोगाला (Maharashtra Electricity Regulatory Commission) जो खर्च दाखवला आहे, प्रत्यक्षात तो खर्च न करता MERC कडून मंजूरी घेऊन बेस्टने परस्पर वीज दर वाढवण्याचं काम केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान वारंवार बेस्ट अधिकार्‍यांशी चर्चा करून देखील यावर तोडगा निघत नव्हता. त्यामुळे महापालिका आयुक्तांची भेट घ्यावी लागल्याचंही मनसे नेत्यांनी सांगितलं.

महापालिकेने मुन्सिपल ऑडिटर समिती नेमावी, अशी मागणी केली आहे. ज्यातून नेमका बेस्टनं किती खर्च केला आणि त्यांच बील वाढवणं योग्य आहे का? हे ही स्पष्ट होईल. त्यामुळे त्वरीत ही समिती नेमण्याची मागणी मनसेनं केली आहे.

तसंच या समितीच्या अहवालानंतर ग्राहकांचे वीज दर कमी करावे किंवा अधिक घेतलेले पैसे परत करावे लागतील, असंही मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी यावेळी सांगितलं.



हेही वाचा

मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख

'तो एक कौटुंबिक कार्यक्रम होता...', डान्स व्हिडीओवर टीका करणाऱ्यांना सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा