Advertisement

आता मूक नाही तर 'मुख बंद' आंदोलन


आता मूक नाही तर 'मुख बंद' आंदोलन
SHARES

दोन वर्षांपूर्वी 9 आगस्ट रोजी क्रांती दिनी मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात झाली होती. या दोन वर्षात मराठा समाजानं आरक्षणासाठी राज्यभरात 58 मोर्चे शांततेत काढून राज्यातच नव्हे तर देशात नवा आदर्श घालून दिला. मात्र आज पर्यंत सरकारने मागण्या काही मान्य केल्या नाही. त्यामुळे या मागण्या सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर 11 ते 2 या वेळात मराठा समाज मुख बंद म्हणजे तोंड बंद ठेऊन आंदोलन करणार आहे.


शांततेच्या मार्गाने बंद

मुंबई, नवी मुबई, ठाणे वगळता राज्यभर बंदची हाक देण्यात आली आहे. शांतता, अहिंसेच्या मार्गाने हा बंद पाळण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांच्या राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला.


सरकारकडून फक्त अश्वासनं

मराठा अरक्षणाबाबत सरकारने आश्वासनांची पूर्तता न केल्यामुळे आज गुरुवारी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली. उच्च न्यायालयाने आंदोलन न करण्याचं आवाहन केल्यामुळे या बंदबाबत संभ्रम निर्माण झाला होता.

58 वेळा शांततेच्या मार्गाने आंदोलन करून एक आदर्श घडवला आहे. तरी सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही. तेव्हा आज आम्ही आमचे कोणतेही गाऱ्हाणे 11 ते 2 काळात मांडणार नसून तोंड बंद ठेवणार आहे. म्हणजे मुखातून कोणतीही घोषणा नाही की बोलणं करणार नाही. आता न बोलताही सरकारला आमच्या भावना कळतील का? हे आम्ही बघणार आहोत.
- वीरेंद्र पवार, समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा


हेही वाचा -

Live Updates : महाराष्ट्र बंद, मुंबईत ठिय्या

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा