भाजपा-शिवसेनेमध्ये मॅच फिक्सिंग - निरुपम

 CST
भाजपा-शिवसेनेमध्ये मॅच फिक्सिंग - निरुपम
CST, Mumbai  -  

सीएसटी - मुख्यमंत्र्यांच्या मनात बिहारी आणि उत्तर प्रदेशमधील लोकांबद्दल राग आहे. त्यांनी हे आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे. भाजपाचे लोक अजूनही पाटण्याचा अपमान करतात. हे चुकीचे आहे. भाजपाचे नेते उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमाला फक्त व्होटबँकेसाठी जात असल्याचा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांनी केलाय. मुख्यमंत्र्याच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करायचा विचार आम्ही करीत आहो. त्याबाबत कायदेशीर सल्ला घेऊन लवकरच तक्रार करणार असल्याचे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी सांगितले.

भाजपा आणि शिवसेनेमध्ये मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. हे दोन्ही पक्ष फक्त मतांसाठी एकमेकांवर टीका करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेना सरकारचे समर्थन कधी मागे घेणार हे सांगत नाहीत. शिवसेनेचे मंत्री राजीनामा देण्याची फक्त धमकी देतात. पण वास्तविक त्यांच्यात राजीनामा देण्याची हिंमत नाही असेही निरुपम यावेळी म्हणाले.

Loading Comments