Advertisement

इच्छुकांच्या रांगेत माजी महापौर


इच्छुकांच्या रांगेत माजी महापौर
SHARES

मुंबई - महापालिका 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी महापौर मोठ्या प्रमाणात रिंगणात उतरणार असून तब्बल 6 माजी महापौर हे इच्छुक उमेदवारांच्या रांगेत उभे आहेत. या निवडणुकीत श्रद्धा जाधव, डॉ. शुभा राऊळ, विशाखा राऊत, स्नेहल आंबेकर, दत्ता दळवी आणि महादेव देवळे यांची नावे जोरदार चर्चेत आहेत.
विद्यमान महापौर स्नेहल आंबेकर यांना पुन्हा तिकीट न देण्याचा निर्धार शिवसेनेने केला असला तरी नशिबाने आंबेकर यांना साथ दिली आहे. त्यांच्या जुन्या प्रभागांचे विभाजन होऊन 195 हा नवीन प्रभाग बनला आहे. हा प्रभाग अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्यामुळे या ठिकाणी स्नेहल आंबेकर किवा त्यांचे पती सूर्यकांत यांची प्रमुख दावेदारी मानली जाते. मात्र, यातील बहुतांशी प्रभाग हा माजी महापौर महादेव देवळे यांचा जुना प्रभाग आहे. त्यामुळे देवळे यांचं नाव चर्चेत आहे. अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या प्रभाग 197 मधून सेनेला उमेदवार न मिळाल्यास स्नेहल आंबेकर यांचा उमेदवारीसाठी विचार होऊ शकतो.
तर माजी महापौर श्रद्धा जाधव यांचा सध्याचा प्रभाग क्रमांक 174 हा खुला झाला आहे. याशिवाय त्यांचा यापूर्वीचा जुना प्रभाग हा नवीन प्रभाग 202 असा झाला आहे. त्यामुळे श्रद्धा जाधव यांची 202 साठी मोर्चेबांधणी सुरू आहे. माहीम-दादरलमधील प्रभाग क्रमांक 191मधून माजी महापौर आणि माजी आमदार विशाखा राऊत यांचं नाव चर्चेत आहे. दहिसरमधील प्रभाग क्रमांक 8 मधून विद्यमान नगरसेविका डॉ. शुभा राऊळ या प्रमुख दावेदार आहेत. तसेच विक्रोळीतील कन्नमवारनगरमधून शिवसेनेच्या वतीने माजी महापौर दत्ता दळवी यांचे नाव चर्चेत आहे. तर याच मतदार संघातून मनसेच्यावतीने प्रियंका शृंगारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिका गटनेते धनंजय पिसाळ हे इच्छुक आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा