15 नगरसेवकांच्या कार्यअहवालाचं प्रकाशन

 CST
15 नगरसेवकांच्या कार्यअहवालाचं प्रकाशन

सीएसटी - 'माझा प्रभाग- माझा नगरसेवक' या पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी करण्यात आले. त्यामध्ये एकूण 15 नगरसेवकांचा समावेश असल्याचं मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांनी सांगितले. त्यामध्ये शिवसेना 6, भाजपा 4, मनसे 3, काँग्रेस आणि अपक्ष यांच्या प्रत्येकी एका नगरसेवकाचा समावेश आहे.

सदरची माहिती जमा करायला १३ कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यामध्ये वॉर्ड क्रमांक 45, 46, 48, 82, 93, 112, 113, 117, 121, 126, 144, 146, 168, 180,188 चा समावेश आहे. माहिती अधिकाराखाली मुंबई मनपाकडे माहिती मागितली असता टाळाटाळ केली. यावरून मुंबई मनपाच्या कामात किती पारदर्शकता दिसून येते ? अशी टीका डॉ. दीपक पवार यांनी यावेळी केली.

Loading Comments