सरकारच्या कामगार विरोधी धोरणाविरोधात परळ नाका इथं राष्ट्रीय मिल मजदूर संघानं निदर्शनं केली. केंद्र आणि राज्य सरकार कामगारांची गळचेपी करत असल्याचा संताप राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी यावेळी व्यक्त केला. तर बीजेपी सरकारच्या हायर आणि फायर पद्धतीमुळे अनेक उद्योग बंद होऊ लागले आहेत. तर कामगार आणि शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम सरकार करीत आहे, असा आरोपही राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी केला.