Advertisement

मंत्रिमंडळ, अधिकारी सेलिब्रेशन मूडमध्ये; मंत्रालय सुनसान

एकीकडे मंत्र्यांचा नागपूर अधिवेशनाचा थकवा अद्याप गेलेला नाही, तर दुसरीकडे अधिकारी वर्गाची सुट्टी अजून संपलेली नसून आता ते नवीन वर्षाच्या स्वागताच्या तयारीत असल्याच्या चर्चा रंगत आहेत. यामुळे नागपूर अधिवेशनानंतर शासन दरबारी फेऱ्या मारणाऱ्या सामान्य लोकांचे मात्र चांगलेच हाल होत आहेत.

मंत्रिमंडळ, अधिकारी सेलिब्रेशन मूडमध्ये; मंत्रालय सुनसान
SHARES

हिवाळी अधिवेशनामुळे अधिकारी वर्ग आणि मंत्री सगळेच नागपूर मुक्कामी असतात. राज्यभरातील जनतेची सरकार दरबारी असलेली कामे ही जवळजवळ महिनाभर थांबतात आणि यामुळे हिवाळी अधिवेशन राज्यभरातील अनेक लोक आपापली कामे करून घेण्यासाठी मुंबईत दाखल होतात. असे असताना नागपूर अधिवेशन संपूनदेखील मंत्रालय अजूनही सुनेसुनेच आहे.


मंत्रालय सुनसान, सामान्य परेशान

एकीकडे मंत्र्यांचा नागपूर अधिवेशनाचा थकवा अद्याप गेलेला नाही, तर दुसरीकडे अधिकारी वर्गाची सुट्टी अजून संपलेली नसून आता ते नवीन वर्षाच्या स्वागताच्या तयारीत असल्याच्या चर्चा रंगत आहेत. यामुळे नागपूर अधिवेशनानंतर शासन दरबारी फेऱ्या मारणाऱ्या सामान्य लोकांचे मात्र चांगलेच हाल होत आहेत. मंत्रालयात मंत्री तर नाहीच, पण त्यांचे अधिकारीही मोठ्या सुट्ट्यांवर असल्याने भेटायचे तरी कोणाला? हा प्रश्न सामान्य लोकांना पडत आहे.


मुख्यमंत्री शपथविधीसाठी दुसऱ्या राज्यात

नागपूर अधिवेशन संपून २ दिवस उलटले, तरी सेनेचे २-३ मंत्री आणि भाजपचे एक दोन मंत्री सोडले, तरी कोणीच मंत्रालयात नाही. मुख्यमंत्री स्वतः दुसऱ्या राज्यातील मुख्यमंत्र्यांचे शपथविधी कार्यक्रम करण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे आठवड्यातील मंत्रिमंडळ बैठकीलाही आधिवेशनानंतर पहिल्या आठवड्यात दांडी मिळाली आहे. दुसऱ्या मंत्र्यांनीही अजून आपली उपस्थिती मंत्रालयात काय, पण मुंबईतच लावलेली नाही, अशी चर्चा आहे.


उपस्थिती नवीन वर्षात

मंत्रालयात मंत्रीच नसतील, तर सामान्य लोकांनी आपल्या व्यथा आणि प्रश्न मांडायचे कोणासमोर? हा प्रश्न उभा राहिलाय. मंत्र्यांचे खाजगी सचिव आणि वरिष्ठ अधिकारीही पाश्चात्य संस्कृतीच्या अधीन गेले आहेत. हिवाळी अधिवेशन संपताच काही अधिजकाऱ्यांनी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सुट्ट्या घेतल्या असून ते पुढील वर्षात मंत्रालयात येणार आहेत. तर कक्ष अधिकारी किंवा उपसचिवसारखे अधिकारी नागपूरवरून अजून आले नसल्याने कामावर रुजूच झालेले नाहीत, अशी परिस्थिती आहे.

थोडक्यात, मंत्रालयातील सध्याचे चित्र पाहता हिवाळी अधिवेशनाचा ताण आणि विदर्भाच्या थंडीमुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ हे ख्रिसमसनंतर आता ३१ डिसेंमबरच्या सेलिब्रेशन मूडमध्ये आसल्यची चर्चा आहे.



हेही वाचा

मंत्रालयीन अधिकारी विकीपिडियावर मराठीत लिहिणार


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा