मुंबई पालिकेचा कारनामा! मिस्ड कॉलमुळे मोदी हैराण!

Mumbai
मुंबई पालिकेचा कारनामा! मिस्ड कॉलमुळे मोदी हैराण!
मुंबई पालिकेचा कारनामा! मिस्ड कॉलमुळे मोदी हैराण!
मुंबई पालिकेचा कारनामा! मिस्ड कॉलमुळे मोदी हैराण!
See all
मुंबई  -  

मुंबई - मुंबई महापालिकेतर्फे आगामी निवडणुकांसाठी मतदारांना आवाहन करण्यात येत आहे. त्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी केल्या जात आहेत. मुंबईकरांना आवाहन करण्यासाठी पालिकेने 'मी मतदान करणार' अशा आशयाचे बॅनर छापले. यावर देण्यात आलेल्या नंबरवर मिस्ड कॉल देण्याचं आवाहन मुंबईकरांना करण्यात आलं. मात्र संबंधित पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्याने यासाठी चुकून चक्क मोदींचा मोबाईल क्रमांक दिला.

या प्रकारामुळे मोदी हैराण आहेत, मात्र हे मोदी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नसून गुजराती मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री अवनी मोदी आहेत.

संबंधित पालिका कर्मचाऱ्याच्या या अजब गोंधळामुळे अवनी मोदीला मोठा मनस्ताप सहन करावा लागला. शेकडो लोकांनी अवनीला मिस्ड कॉल दिले. काहींनी फोनही केले. मात्र या परिस्थितीतही अवनीने लोकांना मार्गदर्शन केले आणि आपल्याला काहीतरी वेगळं करण्याची संधी मिाली आहे असे समजून त्यांनी लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले.

विशेष म्हणजे 'मी मतदान करणार' या मोहिमेसाठीच्या जाहिराती, बॅनर, फलक यावर प्रकाशित मोबाईल नंबर हा एका अभिनेत्रीचा असल्यामुळे पालिकेला लाखोंचा फटका बसला आहे. त्यामुळे या प्रकरणात दोषी असलेल्या अधिकाऱ्यांकडून झालेले नुकसान वसूल करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पालिका आयुक्त अजॉय मेहता यांना पत्राद्वारे केली आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.