पण, कार्यालय अर्धवट का तोडलं? निलेश राणेंचा सवाल?

पण, कार्यालय अर्धवट का तोडलं? असा खोचक प्रश्न निलेश राणे यांनी विचारून काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जखमेवर मीठ चोळलं आहे.

SHARE

पण, कार्यालय अर्धवट का तोडलं? असा खोचक प्रश्न निलेश राणे यांनी विचारून काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जखमेवर मीठ चोळलं आहे. सर्जिकल स्ट्राईक म्हणत मनसेनं काँग्रेसच्या मुंबई कार्यालयाची तोडफोड केली. त्यावर राणे बंधूंनी मनसोक्त तोंडसुख घेत काँग्रेसवर हल्ला चढवला आहे.


निलेश राणेंची कोपरखळी

पक्ष कार्यालयाच्या तोडफोडीवर माजी खासदार निलेश राणे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून कोपरखळ्या मारल्या आहेत. काँग्रेस कार्यालयाचा फोटो पोस्ट करत ''हे काँग्रेसवाले काचा मोजतायत.. आता काँग्रेसवाले कामाला लागणार, ज्याचं काम नसेल तो पण दिल्लीला चर्चेला जाणार. परत आल्यावर ह्याच कार्यालयात बसून दिल्लीला ज्यांनी भेट दिली नाही त्यांना भेटून आलो सांगणार. पण कार्यालय अर्धवट का तोडलं ??'', असा टोला लगावला. यामुळे या घटनेने आधीच संतापलेले काँग्रेस कार्यकर्ते चिडणार यात वाद नाही.स्त्रियांचा आदर नाही का?

काँग्रेस कार्यलयाच्या तोडफोडीवर प्रतिक्रया देताना मनसेने जे केले ते चुकीचंच आहे, यात वाद नाही, असं मत नितेश राणे यांनी व्यक्त केलं. मात्र महात्मा गांधी यांच्या तत्वांवर चालणारे आणि त्यांचे अनुयायी म्हणवणारे मुंबई काँग्रेस त्यांना त्याच भाषेत धमकावतात याचा अर्थ काय? असा सवालही त्यांनी केला.मनसेचा निषेध दर्शवण्यासाठी त्यांना बांगड्या दाखवणं कितपत योग्य आहे? असा प्रश्न त्यांनी ट्विटच्या माध्यमातून केला आहे. असा निषेध नोंदवणं म्हणजे स्त्रियांचा अपमान नाही का ? अशा वेळी काँग्रेसचा आदर्शवाद कुठे गेला? असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे.हेही वाचा-

काँग्रेसला इंदिराजींच्या शब्दांत मनसेचं प्रतिउत्तर

करारा जबाब मिलेगा, मनसे हल्ल्यावर निरूपमचं उत्तर, संदीप देशपांडे पोलिसांच्या ताब्यातसंबंधित विषय
ताज्या बातम्या