Advertisement

विधानसभेचं पार्किंग स्टिकर १०० रुपयांत?


विधानसभेचं पार्किंग स्टिकर १०० रुपयांत?
SHARES

अधिवेशन काळात विधानसभा परिसरात आमदारांची वाहने पार्किंग करण्यासाठी स्टिकर्स दिली जातात. मात्र, काहीजण हे स्टिकर्स आपल्या गाडीवर लावून त्याचा गैरवापर करत असल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी केला. त्यामुळे सरकारने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी राणे यांनी केली.


स्टिकर मिळतात दुकानात

नितेश राणे यांनी शुक्रवारी विधानसभेत हा विषय उपस्थित केला. आमदारांना अशोक स्तंभाचे चिन्ह असलेला स्टिकर्स त्यांच्या वाहनावर लावण्यास देण्यात येतो. मात्र हा स्टिकर बाहेर दुकानांत १०० रुपयांना विकला जात असल्याची माहिती नितेश राणे यांनी दिली.



खोपडेकडे स्टिकर आला कुठून?

तसंच बाळा खोपडे नामक व्यक्ती त्याच्या वाहनावर हा स्टिकर्स लावून राजरोस फिरत आहे. बाळा खोपडे नावाचा कोणीही आमदार नाही. मग या व्यक्तीकडे हा स्टिकर्स आला कुठून? याची चौकशी झाली पाहिजे. यातून गंभीर घटना घडू शकते. या प्रकरणाची दखल घेऊन सरकारने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नितेश राणे यांनी केली.

भाजपाच्या मनिषा चौधरी यांनी आपल्याही मतदारसंघात अशा घटना उघडकीस आल्या आहेत. आमदाराचे स्टिकर्स लावून वाहने फिरत असतात, असे सांगत त्यांच्यावर सरकारने कारवाई करावी अशी मागणी केली. गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी सरकार या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन यावेळी दिले.


विधानसभा सदस्यांचे स्टिकर १०० रुपयांत मिळत असतील, तर सभागृहात बसणाऱ्या आमदारांची किंमत काय? यावर लवकरात लवकर कारवाईची मागणीमी केली आहे.
- नितेश राणे आमदार काँग्रेस

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा