स्वकीयांसाठी आमदारांची फिल्डिंग

 Andheri west
स्वकीयांसाठी आमदारांची फिल्डिंग
स्वकीयांसाठी आमदारांची फिल्डिंग
See all
Andheri west, Mumbai  -  

अंधेरी - आपल्या जवळच्या व्यक्तीला महापालिका निवडणुकीत तिकीट मिळावी यासाठी भाजपाचे आमदार अमित साटम आणि आमदार भारती लव्हेकर प्रयत्न करताना दिसत आहेत. अंधेरी के पश्चिम विभागात 13 पैकी नऊ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. तर राहिलेल्या चार पैकी एक ओबीसी पुरुष आणि तीन खुला वर्ग झाल्याने सर्वच पक्षांमध्ये धावपळ सुरू आहे. प्रभाग क्र. 68 मध्ये अंधेरी विधानसभा आमदार अमित साटम हे त्यांचा मेहुणा रोहन राठोड यांना तिकीट मिळवून देण्याच्या प्रयत्नात आहेत. तर दुसरीकडे वर्सोवा विधानसभा आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी आपल्या पीए योगीराज दाबोडेकर यांना तिकीट मिळवून देण्यासाठी कंबर कसली आहे. वरिष्ठ नेत्यांमध्ये जवळच्या व्यक्तींना तिकीट मिळवण्यासाठी चुरस निर्माण झाल्याने सामान्य कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचं वातवरण आहे.

Loading Comments