अखेर शेकापच्या कार्यालयावर हातोडा

Pali Hill
अखेर शेकापच्या कार्यालयावर हातोडा
अखेर शेकापच्या कार्यालयावर हातोडा
See all
मुंबई  -  

मुंबई - कुलाबा वांद्रे सीप्झ या मेट्रो 3 च्या स्थानक उभारणीसाठी राजकीय पक्षांची कार्यालये स्थलांतरित करण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी बुधवारी शेतकरी कामगार पक्षाचं कार्यालय तोडण्यात आलं. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने मागील महिन्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना पक्ष कार्यालय स्थलांतर करण्यासाठी नोटीस बजावली होती. कार्यालयं लवकरात लवकर स्थलांतर न केल्यास ते जमीनदोस्त केले जातील असा इशारा नोटीसमध्ये देण्यात आला होता. या पक्षांसह शेकाप, रिपाइं या पक्षांचीही कार्यालये स्थलांतरित होणार असून या सर्व पक्षांना पर्यायी जागा देऊन अनेक दिवस झाले, तरीही नव्या जागेत ती स्थलांतरित झालेली नाहीत. त्यामुळे अखेर शेकापचं कार्यालय तोडण्यात आलं. 

दरम्यान, बेलार्ड इस्टेट येथे देण्यात आलेल्या जागेला काँग्रेसने नकार दर्शवला, त्याऐवजी चर्चगेट परिसरातील एच. आर. कॉलेजजवळील एपीजे हाऊसची मागणी काँग्रेसने केलीय. ती जागा देण्याची मागणी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांकडे केली असून अतिरीक्त भाडे देण्याची तयारी पक्षानं दर्शवली आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.