Advertisement

हे सरकार अमराठी आहे काय?, मराठी भाषा दिन कार्यक्रम करण्यावरून मनसे आक्रमक

मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईत आयोजित केलेल्या कार्यक्रमाला सरकारने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे.

हे सरकार अमराठी आहे काय?, मराठी भाषा दिन कार्यक्रम करण्यावरून मनसे आक्रमक
SHARES

मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईत आयोजित केलेल्या कार्यक्रमाला सरकारने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे. “आता शंका यायला लागली आहे की हे सरकारच अमराठी आहे की काय? आम्ही हे ठणकावून सांगतो की नियोजित कार्यक्रम आम्ही सर्व नियम पाळून करणार म्हणजे करणारच”, अशा शब्दांत मनसे (mns) नेते अमेय खोपकर यांनी सरकारला जाहीर आव्हानच दिलं आहे.

कवीवर्य कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्मदिनी म्हणजेच २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात मराठी भाषा दिन साजरा केला जातो. या दिवशी दरवर्षी मनसेकडून कार्यक्रम केले जातात. या वर्षी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्ते आणि जनतेला जाहीर पत्राद्वारे ‘मराठी स्वाक्षरी मोहिमे’चं आवाहन केलं आहे.

मराठी राजभाषेच्या निमित्ताने एक सुरुवात केली तर आपण एक मोठा पल्ला गाठू तो म्हणजे आपण आपली स्वाक्षरी जी आपली ओळख असते ती मराठीत सुरु करूया. त्याची सुरुवात करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्रातील शाखाशाखांमध्ये फलक लावलेले असतील, त्या ठिकाणी सहकुटुंब जाऊन मराठीत स्वाक्षरी करा आणि त्याच वेळेला आपली भाषा अधिक मोठी करण्याची प्रतिज्ञा करा, असं राज ठाकरे (raj thackeray) यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

हेही वाचा- “मी निर्णय घेण्याआधी तूच निर्णय घे”, संजय राठोड यांचा राजीनामा निश्चित?

त्यानुसार मनसेकडून शिवाजी पार्क इथं कार्यक्रम घेण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती. मात्र, ही परवानगी नाकारण्यात आल्याने मनसे आक्रमक झाली आहे. त्यावर अमेय खोपकर यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रीया नोंदवली आहे. कोविडचा प्रसार होऊ नये यासाठी सरकारने जी नियमावली आखून दिलेली आहे. त्या नियमांचं काटेकोर पालन करून मनसेने मराठी भाषा दिन कार्यक्रम आयोजित केला होता. सरकारने या कार्यक्रमाला कोविड प्रसाराचं कारण देत परवानगी तर नाकारलीच, वर कारवाईचा धाक दाखवला.

ज्यांच्यावर गंभीर आरोप आहेत, अशा संजय राठोडसारख्या मंत्र्याचे समर्थक लाखोंच्या संख्येने एकत्र येऊन शक्तीप्रदर्शन करतात, अशा गर्दीवर कारवाई करण्याची ज्यांच्यात धमक नाही, त्यांच्या डोळ्यात ‘मराठी भाषा दिवस’ का खुपतो? महाबिघाडी सरकारचं डोकं ठिकाणावर नाही. यावर शिक्कामोर्तबच झालंय. पण त्यापुढे जाऊन आता शंका यायला लागली आहे की हे सरकारच अमराठी आहे की काय?  

आम्ही हे ठणकावून सांगतो की नियोजित कार्यक्रम आम्ही सर्व नियम पाळून करणार म्हणजे करणारच, अशा शब्दांत अमेय खोपकर यांनी सरकारला आव्हान दिलं आहे.

(mns aggressive on marathi bhasha din celebration)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा