संदीप देशपांडे पत्नीसाठी निवडणूक रिंगणात

M. B. Raut Road, Mumbai  -  

दादर - निवडणुकीचा प्रचार सर्वच पक्ष अगदी जोमाने करत आहेत. त्यात मनसेचं इंजिनही जोरदार धावतंय. दादरचा वॉर्ड क्रमांक 185 हा महिलांसाठी आरक्षित झाला. या वॉर्डमधून संदीप देशपांडे यांच्या पत्नी स्वप्ना देशपांडे यांना उमेदवारी मिळालीय. देशपांडे दाम्पत्यांनी गुरुवारी शिवाजी पार्क येथील एम.बी.राऊत रोड एलएमए परिसरात जाऊन प्रचार केला. त्यांच्या प्रचाराला माजी आमदार नितीन सरदेसाई उपस्थित होते.

स्वप्ना देशपांडे यांच्यासमोर शिवसेनेच्या माजी महापौर विशाखा राऊत यांचं तगडं आव्हान आहे. स्वप्ना देशपांडे राजकारणात नव्या असल्या तरी संदीप देशपांडे यांनी आतापर्यंत दादर परिसरात केलेल्या कामांचा त्यांना फायदा होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याचवेळी स्वप्ना देशपांडे उत्तम कामगिरी बजावतील असा विश्वास रहिवाशीही व्यक्त करत आहेत.

Loading Comments