Advertisement

व्यवसायात आक्रमकता दाखवा - राज ठाकरे

मराठी माणसांनी व्यवसायाबरोबर महाराष्ट्र समजून घेणं महत्वाचं अाहे. इतरांना व्यवसायाचा गुण DNA मधून मिळाला असला, तरी मराठी व्यावसायिकांनी आक्रमक होणं आवश्यक आहे, असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं.

व्यवसायात आक्रमकता दाखवा - राज ठाकरे
SHARES

मराठी माणसानं 'अंथरून पाहून पाय पसरा' या जुन्या म्हणी बाजूला ठेऊन व्यवसायात आक्रमकता दाखवावी, असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं. 'महाराष्ट्र बिजनेस क्लब'ने माटुंग्यातील सिटीलाईट हाॅलमध्ये बुधवारी सकाळी महाराष्ट्रातील उद्योजकांसाठी एक विशेष कार्यक्रम अायोजीत केला  होता. या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी मराठी उद्योजकांशी संवाद साधला .


बीएसमीत राजस्थानी कंत्राटदार

यावेळी ते म्हणाले, प्रथम महाराष्ट्र काय आहे हे आपणं समजून घेतलं पाहिजे. महाराष्ट्रात बाहेरून लोक आले ते व्यवसाय करत बसले आणि आपले लोक त्यांच्या हाताखाली नोकरी करत बसले. मुंबई महापालिकेत राजस्थानमधील एका गावातील कंत्राटदार आहे. महाराष्ट्रात सर्व सोयी-सुविधा उपलब्ध असल्याने बाहेरून लोक व्यवसायासाठी येतात. त्यांचा महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. आपल्या महाराष्ट्रातील शहरांचं महत्व दुर्दैवाने मराठी लोकांना समजत नाही, अशीही खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.


महत्वाची शहरं हातातून जातील

आज शहरांमध्ये मराठी लोकसंख्या कमी होत आहे आणि बाहेरील लोकांची संख्या वाढत आहे. मराठी माणसांनी व्यवसायाबरोबर महाराष्ट्र समजून घेणं महत्वाचं अाहे. इतरांना व्यवसायाचा गुण DNA मधून मिळाला असला, तरी मराठी व्यावसायिकांनी आक्रमक होणं आवश्यक आहे. मुंबई, पुण्याकडे मराठी माणसाचा पाहण्याचा दृष्टीकोन आणि इतरांचा वेगळा आहे. या लोकांना या शहरांना ताब्यात घ्यायचं अाहे. मराठी व्यावसायिकांनी आता लक्ष दिलं नाही तर महाराष्ट्रातील पुणे, ठाणे, मुंबईसारखी महत्वाची शहरं हातातून जातील, अशी भीतीही राज यांनी व्यक्त केली.


बुलेट ट्रेन गुजरातमध्येच का?

आपल्या देशाच्या पंतप्रधानांच्या मनात सतत गुजरात असतं. त्यामुळे सर्व गोष्टी गुजरातमध्ये जातात. बुलेट ट्रेन गुजरातमध्येच का दुसरीकडे का नाही, असा सवालही राज यांनी उपस्थीत केला. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या स्थळांवर स्वःताचा ठसा उमठवण्याचं मराठी व्यावसायिकांना अावाहन करून राज ठाकरे म्हणाले की, महाबळेश्वरमध्ये ६०ते ७० टक्के लोक गुजराती अाहेत. वेगवेगळ्या राज्याची भाषा, संस्कृती वेगळी आहे. अाज कोकणात काय असं कमी आहे की तिकडे चायनिज दुकाने लागतात. महाराष्ट्रावर मी एक डाॅक्युमेन्ट्री बनवतोय. महाराष्ट्रातील ८ भारतरत्नांपैकी ७ भारतरत्न ही कोकण पट्ट्यातील आहेत आणि या पैकी ४ भारतरत्न ही दापोलीतील अाहेत.


हेही वाचा -

अमित शाह मुंबई दौऱ्यावर, 'मातोश्री' भेटीचं काय?

म्हणून मी नजरकैदेत -संजय निरूपम



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा