Advertisement

तामिळ अस्मितेचं 'कमल', राज यांचं नवं व्यंगचित्र


तामिळ अस्मितेचं 'कमल', राज यांचं नवं व्यंगचित्र
SHARES

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कुंचल्यातून व्यंगचित्र रेखाटून पुन्हा एकदा भाषिक अस्मितेकडं लक्ष वेधून घेतलं आहे. दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांच्यानंतर अभिनेते कमल हसन यांनीही राजकारणात प्रवेश केला आहे. याच प्रवेशावर राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून तामिळनाडूतील भाषिक अस्मिवर भाष्य केलं आहे.

राज ठाकरे यांनी रेखाटलेल्या व्यंगचित्रात तामिळनाडू नावाचा एक तलाव रेखाटून या तलावात एक मोठं कमळ उगवल्याचं दाखवलं आहे. या कमळाच्या पानांवरच ‘कमल’ असं लिहिण्यात आलं आहे. कमळाच्या पाकळ्यांवर तामिळ अस्मिता असं लिहून, कमळाच्या मध्यभागी अभिनेते कमल हसन उभं असल्याचं दाखवलं आहे.


भाजपावरही निशाणा

एवढंच नव्हे, तर तलावात एक छोटं कमळही दाखवलं आहे. हे कमळ भाजपाचं आहे. 'एआयडीएमके'च्या प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री जयललीता यांच्या मृत्यूनंतर तामिळनाडूत हातपाय पसरू पाहणाऱ्या भाजपावरही या व्यंगचित्रातून निशाणा साधण्यात आला आहे. तलावाच्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उभे आहेत आणि शहा पंतप्रधानांना म्हणतात “साहेब, हे अचानक कुठून उगवलं आता?”



हेही वाचा-

महाराष्ट्रातली 'महामुलाखत'! 'मुंबई लाइव्ह'वर

राज ठाकरेंचा चौकीदारांवर निशाणा ...!

बिनचेहऱ्याच्या जातीयवादी नेत्यांना राज ठाकरेंचे फटकारे



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा