Advertisement

राज ठाकरेंना दंड? ‘ती’ बातमी धादांत खोटी

राज ठाकरे यांच्यावर मुंबई-अलिबाग प्रवासादरम्यान दंडात्मक कारवाई झाल्याची बातमी काही प्रसार माध्यमांनी प्रसिद्ध केली होती.

राज ठाकरेंना दंड? ‘ती’ बातमी धादांत खोटी
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर मुंबई-अलिबाग प्रवासादरम्यान दंडात्मक कारवाई झाल्याची बातमी काही प्रसार माध्यमांनी प्रसिद्ध केली होती. परंतु ही बातमी धादांत खोटी असून बातमीची कोणतीही खातरजमा न करता माध्यमांनी चुकीचं आणि खोडसाळ वृत्त प्रसिद्ध केल्याचं मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी स्पष्ट केलं. (mns chief raj thackeray faced penalty for not wearing a mask is incorrect news says nitin desai)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या कुटुंबासह शुक्रवारी मुंबईहून अलिबागला रवाना झाले होते. यावेळी त्यांनी मुंबई-मांडवा रो रो फेरीने प्रवास केला. राज ठाकरे मोटीवरच्या मोकळ्या जागेत मास्क परिधान न करताच उभे होते. तसंच यावेळी त्यांनी सिगरेटही शिलगावली होती. या सर्व प्रकारानंतर बोटीवरील अधिकाऱ्यांनी राज ठाकरेंना सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान न केल्याबद्दल १००० रुपयांचा दंड भरायला लावला, असं वृत्त काही प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलं. 

हेही वाचा - ‘ब्रँड ठाकरे’असला, तरी…

त्यासंदर्भात मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी स्पष्ट केलं की, पत्रकारितेच्या संकेतानुसार कुठलीही बातमी देण्यापूर्वी संबंधित व्यक्तिंकडून त्या बातमीची खातरजमा केली जाते. कुठलाही पुरावा नसताना तसंच संबंधितांकडून कुठलीही शहानिशा न करता केवळ ऐकीव माहितीवर आधारीत काही माध्यमांनी हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

सदर प्रवासात मी स्वत: राज ठाकरे यांच्या सोबत असल्याने अशी कोणतीच घटना घडली नसल्याचे ठामपणे सांगू शकतो. त्यामुळे ही बातमी पूर्णपणे चुकीची असून अशा खोडसाळ बातम्यांमुळे लोकांची दिशाभूल होते.  

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा