Advertisement

बिस्लेरी बाटल्यांवरील लेबल्स मराठीत, पण कुणामुळे?


  बिस्लेरी बाटल्यांवरील लेबल्स मराठीत, पण कुणामुळे?
SHARES

अनधिकृत फेरीवाला प्रकरणानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच अॅक्टिव्ह झाली असून मनसेने आता पक्षाचा ट्रेडमार्क मराठी भाषेचा मुद्दा पुन्हा उचलून धरण्यास सुरूवात केली आहे. त्याला घाबरून म्हणा किंवा उपरती झाली म्हणून कदाचित, बाजारातील एका प्रोडक्टचं नाव मराठीतून दिसू लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. हे प्रोडक्ट आहे, बिस्लेरीची पाण्याची बाटली. एरवी केवळ इंग्रजीतून दिसणारे या पाण्याच्या बाटलीवरील लेबल्स आता मराठीतूनही दिसू लागले आहेत. हा बदल स्वागतार्ह असला, तरी या बदलाचं श्रेय घेण्यासाठी सध्या मनसे आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात चढाओढ लागल्याचंही दिसून येत आहे.   बँकेतील सर्व व्यवहार मराठीतून झालेच पाहिलजेत, अशी गर्जना करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत दुकानांच्या सर्व पाट्या आणि वस्तूंची नावे मराठीत असावी, याकरीता पुन्हा आंदोलन हाती घेण्याचा इशारा दिला होता. त्याअगोदर बिस्लेरीने पाण्याच्या बाटलीवरील लेबल मराठीत छापल्याने 'बिस्लेरीने आमच्या दणक्यानंतर बाटलीवरील नाव मराठीत छापलं' असा दावा मनसेकडून केला जात आहे.


IMG-20171122-WA0129.jpg


स्वाभिमान म्हणतंय आमच्यामुळे

तर, दुसरीकडे 'बिस्लेरी कंपनीने बाटलीवरील नाव मराठीत छापण्याची मागणी 'स्वाभिमान संघटनेने’ सर्वप्रथम केली होती', असा दावा नितेश राणे यांनी पुराव्यासह त्यांच्या फेसबुक पेजवर केला आहे. त्यामुळे बिस्लेरी पाण्याच्या बाटल्यांवरील नाव नेमकं कुणामुळे झालं, याची चर्चा मात्र सध्या जोरात रंगली आहे. नितेश राणे यांनी बिस्लेरी कंपनीला यासंदर्भात पाठवलेलं पत्रच त्यांनी फेसबुक पेजवर टाकलं आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा