मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यावरून पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. औरंगाबाद येथील सभेला संबोधित करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला ठणकावले आहे.
ते म्हणाले की, 3 तारखेपर्यंत मशिदीवरील भोंगे हटवले नाहीत तर 4 तारखेपासून कोणीही ऐकणार नाही आणि मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवण्यात येईल.
यासोबतच राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला. सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याचा समाचार घेत राज ठाकरे यांनी सांगितले की, सुप्रिया सुळे यांनीच शरद पवार नास्तिक असल्याचे लोकसभेत सांगितले आहे.
यासोबतच राज ठाकरेंनी शरद पवारांवर आरोप केला की,पवार कोणत्याही सभेत छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाहीत.
तसंच राज ठाकरे म्हणाले की, पवारांनी जेम्स लेनवरुन बाबासाहेब पुरंदरे यांना त्रास दिला, औरंगाबादच्या सभेत राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य केले आहे. ज्या जेम्स लेनवरून 10 -15 वर्ष राजकारण यांनी केलं, तो म्हटला की मी कधीच पुरंदरेंना भेटलो नाही. तुमची केंद्रात सत्ता होती तर का नाही आणला जेम्स लेनला महाराष्ट्रात असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.