Advertisement

मुंबई कशी पोखरली जातेय, ते बघा, मनसेचा नवा व्हिडिओ व्हायरल

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घुसखोरांविरोधात (illigal bangladeshi and pakistani residents) काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आपला नवा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

मुंबई कशी पोखरली जातेय, ते बघा, मनसेचा नवा व्हिडिओ व्हायरल
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घुसखोरांविरोधात (illigal bangladeshi and pakistani residents) काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आपला नवा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये आगीच्या ज्वाळांमध्ये धुमसणारं वांद्र्यातील (bandra garib nagar) गरीब नगर आणि बेहराम पाडा (behram pada) दाखवण्यात आलं आहे. ही आग नेमकी कशी लागली? आग लागली की लावण्यात आली, यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे रोखठोक भाष्य करताना दिसत आहे. या व्हिडिओच्या (video post) माध्यमातून मोर्चासाठी वातावरणनिर्मिती करण्याचा मनसेतर्फे प्रयत्न केला जात आहे.

हेही वाचा- घुसखोरांना हाकलायचंय? आधी वांद्र्यापासून सुरूवात करा, मनसेचं मातोश्रीबाहेर पोस्टर

भारतात बेकायदेशीररित्या राहणाऱ्या बांगलादेशी आणि पाकिस्तानी नागरिकांना (illigal bangladeshi and pakistani residents) हाकलून देण्याच्या मागणीसाठी येत्या ९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मुंबईत मोर्चा काढण्यात येत आहे. मुंबईतील मरिन ड्राइव्ह ते आझाद मार्गावर (mns rally) हा मोर्चा काढण्यात येत असून त्यासाठी मनसेकडून जोरदार तयारी केली जात आहे. मनसेचे युवा नेते आणि राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे (amit thackeray) यांनी या मोर्चाच्या मार्गाची शुक्रवारी पाहणी देखील केली.

'महाराष्ट्राची राजधानी घुसखोर पोखरत आहेत' या वास्तवाचं भान वेळीच आलं तर आणि तरंच हे शहर वाचू शकेल, या कॅप्शनखाली हा व्हिडिओ टाकण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये आपली राजधानी मुंबई कशी पोखरली जात आहे ते पाहा म्हणत जळणाऱ्या गरीब नगरचे फुटेज दाखवण्यात आले आहे. त्यानंतर या मागचं वास्तव ऐका, म्हणत या जळणाऱ्या झोपडपट्टीत बांगलादेशी घुसखोर राहत असल्याचं म्हणताना राज ठाकरे दिसत आहेत. शिवाय या बांगलादेशींना इथं राहायला जागा कशी मिळते? इथं अनधिकृत बांधकामे उभी रहात असताना अधिकाऱ्यांवर कारवाई कशी होत नाही? असा प्रश्नही राज ठाकरे उपस्थित करताना दिसतात.    

हेही वाचा- डोंबिवलीत गुलाबी रस्ते, अधिकाऱ्यांचे गाल लाल करायचे का? - राजू पाटील

याआधीही मनसेच्या वतीने एक व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्यात आला होता. ही लढाई मोहल्ल्यांमधून भारतविरोधी कारवाई करणाऱ्यांविरोधातील आहे, ही लढाई देशाला पोखरणारी वाळवी उखडून टाकण्यासाठी आहे. भारत माझा देश आहे. पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांचा नाही. त्यांना या देशातून हाकललंच पाहिजे, असा संदेश या व्हिडिओतून देण्यात आला होता.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा