Advertisement

घुसखोरांना हाकलायचंय? आधी वांद्र्यापासून सुरूवात करा, मनसेचं मातोश्रीबाहेर पोस्टर


घुसखोरांना हाकलायचंय? आधी वांद्र्यापासून सुरूवात करा, मनसेचं मातोश्रीबाहेर पोस्टर
SHARES

भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांना (illigal bangladeshi and pakistani residents) हाकलून द्या, ही शिवसेनेची (shiv sena) जुनीच मागणी असून मनसेने उगीच त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करून नये, अशी खोचक टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी मनसेचं नाव न घेता केली होती. त्याला मनसेकडून (mns) आक्रमकपणे उत्तर देण्यात आलं आहे. घुसखोरांना हाकलून दिलं पाहिजे हीच जर भूमिका असेल, तर त्याची सुरूवात वांद्र्यातील अंगणापासून सुरू करा, असा सल्ला मनसेने मातोश्रीबाहेर (matoshree) पोस्टर लावून केला आहे.

हेही वाचा- घुसखोरांना हाकलण्याचं उगाच श्रेय घेऊ नका, उद्धव ठाकरेंचा मनसेला टोला

भारतात बेकायदेशीररित्या राहणाऱ्या बांगलादेशी आणि पाकिस्तानी नागरिकांना illigal bangladeshi and pakistani residents) हाकलून देण्याच्या मागणीसाठी येत्या ९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांनी मरिन ड्राइव्ह ते आझाद मार्गावर निघणाऱ्या या मोर्चाला परवानगी दिली आहे. मनसेच्या या मोर्चाची केवळ मुंबईतच नाही, तर देशभरात चर्चा आहे. मनसेने (mns) कडव्या हिंदुत्वाच्या (hindutva) दिशेने वाटचाल सुरू केल्याने त्याचा शिवसेनेच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो, असं भाकीत राजकीय वर्तुळातून वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांकडून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसेला लक्ष्य केलं जात आहे.  

त्यातच सामनाचे संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बांगलादेशी घुसखोरांबाबत प्रश्न विचारला होता. भारतात राहणाऱ्या बांगलादेशी आणि पाकिस्तानी (bangladeshi and pakistani) घुसखोरांना हाकलून दिलं पाहिजे, या भूमिकेशी आपण ठाम आहात का? 

या प्रश्नावर ठाकरे म्हणाले, का ठाम असू नये? घुसखोर हा घुसखोरच असतो. त्यांना ‘पद्म’ पुरस्काराने सन्मानित करता येणार नाही. मुळात घुसखोरांना हाकला ही भूमिका बाळासाहेबांची (bal thackeray) आहे. यांनी उगाच श्रेय घेऊ नये. असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे (raj thackeray) यांना टोला हाणला आहे. बाळासाहेबांनी ही भूमिका आधीच ठामपणे मांडली आहे. ही नवीन भूमिका नाही. पाकिस्तानी आणि बांगलादेशींना हाकलावं लागेल. कोणी अडवलंय तुम्हाला?" असं म्हणत केंद्र सरकारला देखील ठाकरे यांनी आव्हान दिलं होतं.

हेही वाचा- ‘मनसेला शिकवण्याचा आगाऊपणा करु नये’, राम कदमांना खोपकरांचा इशारा

त्यावर कडी करत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट मातोश्रीबाहेरच (matoshree) पोस्टर लावलं आहे. माननीय मुख्यमंत्री साहेब पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना हिंदुस्थानातून हाकललंच पाहिजे, हीच आपली भूमिका असेल तर प्रथम आपल्या वांद्र्यातील अंगणात घुसखोरांनी भरलेले मोहल्ले साफ करा, असं आव्हान दिलं आहे. 

मनविसेचे उपाध्यक्ष अखिल चित्रे यांनी हे पोस्टर लावलं आहे. अद्याप तरी या पोस्टरवर शिवसेनेकडून कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.   

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा