Advertisement

डोंबिवलीत गुलाबी रस्ते, अधिकाऱ्यांचे गाल लाल करायचे का? - राजू पाटील

डोंबिवली एमआयडीसीतील (Dombivali midc) रस्ते प्रदूषणामुळे गुलाबी झाल्याची चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी डोंबिवली एमआयडीसीचा नुकताच दौरा केला.

डोंबिवलीत गुलाबी रस्ते, अधिकाऱ्यांचे गाल लाल करायचे का? - राजू पाटील
SHARES

डोंबिवलीतील (dombivali pollution) वाढत्या प्रदूषणाच्या पातळीबरोबरच येथील राजकारणही तापायला लागलं आहे. येथील प्रदूषणासंदर्भात वारंवार तक्रारी करूनही शासकीय अधिकारी या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहेत, त्यामुळे या अधिकाऱ्यांचे गाल लाल करायचे का? असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील (mns mla raju patil) यांनी उपस्थित केला आहे. 

हेही वाचा- आता वॉर्डांची ओळख रंगावरून होणार

मागील २ दिवसांपासून डोंबिवली एमआयडीसीतील (Dombivali midc) रस्ते प्रदूषणामुळे गुलाबी झाल्याची चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी डोंबिवली एमआयडीसीचा नुकताच दौरा केला. या दौऱ्यात मुख्यमंत्री आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना भेटून एमआयडीसीतील रस्त्यांची अवस्था सुधारण्यासाठी तसंच प्रदूषण कमी करण्यासाठी दिलेल्या निवेदनाचं स्मरणपत्र राजू पाटील (raju patil) यांच्याकडून देण्यात आलं तसंच संबंधित बेजबाबदार कंपन्या आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. 

त्याआधी या प्रश्नावर आवाज उठवताना राजू पाटील (mla raju patil) यांनी डोंबिवली एमआयडीसीत गुलाबी रस्ते, हिरवा पाऊस, प्रदूषणाच्या (pollution)  मुद्द्यावर तक्रारी करून, निवेदने व पत्रं देऊनही काहीच फायदा होत नाही, त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांचे गाल लाल करायचे करायचे का? असा प्रश्न राजू पाटील यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांना टॅग करून विचारला होता.   

हेही वाचा- दीड लाख लोकांनी खाल्ली शिवभोजन थाळी

दरम्यान, एमआयडीसीतील रस्ते प्रदूषणामुळे (dombivali pollution) गुलाबी झाल्याचं दाखवून कंपनी मालकांना त्रास देण्याचा प्रकार होत आहे. प्रदूषणाच्या मुद्यावर वाद निर्माण करून उद्योजकांना लक्ष्य करण्यात येत असेल तर सरकारच्या नोटिसा येण्यापूर्वीच आम्ही आमच्या कंपन्या बंद करतो, असा इशारा ‘कल्याण-अंबरनाथ मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन’ने (कामा) प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिला आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा