Advertisement

राज ठाकरेंनी दिल्या व्यंगचित्राकारदिनाच्या ‘अशा’ शुभेच्छा, शेअर केली स्वतःची दुर्मिळ अर्कचित्रं, नक्की बघा...

जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत: काढलेली दुर्मीळ अर्कचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत.

राज ठाकरेंनी दिल्या व्यंगचित्राकारदिनाच्या ‘अशा’ शुभेच्छा, शेअर केली स्वतःची दुर्मिळ अर्कचित्रं, नक्की बघा...
SHARES

आज माझ्या संग्रहात डोकावलं तेंव्हा माझी जुनी 'अर्कचित्रं सापडली. ही अर्कचित्रं इथे टाकत आहे. जरूर बघा, असं म्हणत जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत: काढलेली दुर्मीळ अर्कचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत. या अर्कचित्रांना नेटकऱ्यांकडून जोरदार लाईक्स मिळत आहेत.  

सन १९९९ साली ‘चेहरे मोहरे’ नावाने राज ठाकरे यांनी काढलेल्या अर्कचित्राचं प्रदर्शन मुंबईत भरवण्यात आलं होतं. या प्रदर्शनाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन, अनिल कपूर, माधुरी दिक्षित, प्रसिद्ध चित्रकार एमएफ हुसेन इ. मान्यवर उपस्थित राहिले होते.

 या प्रदर्शनातील अर्कचित्रांमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी अशा दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.

हेही वाचा - चाकरमान्यांसाठी एकदाच काय ते धोरण ठरवा- नितेश राणे

या प्रदर्शनातील काही क्षणचित्रे चित्रफितीच्या माध्यमातून सादर करण्यात आली आहेत. दि. बाळासाहेब ठाकरे, दि. श्रीकांत ठाकरे ह्यांच्या हाताखाली व्यंगचित्रकलेचे धडे गिरवणाऱ्या राज ठाकरेंचं १९९९ सालचं 'चेहरे मोहरे' हे पहिलं प्रदर्शन म्हणजे दोन्ही गुरूंना दिलेली मानवंदना. त्या प्रदर्शनाची झलक दाखवणारी चित्रफीत, असं मनसे अधिकृत ट्विटर हँडलवर टाकण्यात आलं आहे.  

हेही वाचा - महाराष्ट्रावर संकट येताच परप्रांतीय पळ काढतात, आपल्या मराठी तरूणांना संधी द्या- राज ठाकरे

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा