Advertisement

महाराष्ट्रावर संकट येताच परप्रांतीय पळ काढतात, आपल्या मराठी तरूणांना संधी द्या- राज ठाकरे

महाराष्ट्रावर जेव्हा संकट येतं, तेव्हा इथले परप्रांतीय आपापल्या राज्यात परत जातात, असं मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं.

महाराष्ट्रावर संकट येताच परप्रांतीय पळ काढतात, आपल्या मराठी तरूणांना संधी द्या- राज ठाकरे
SHARES

महाराष्ट्रावर जेव्हा संकट येतं, तेव्हा इथले परप्रांतीय आपापल्या राज्यात परत जातात. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने परप्रांतीयांवर अवलंबून राहण्याऐवजी आपल्याच राज्यातील बेरोजगार तरूणांना संधी दिली पाहिजे, असं मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने व्यक्त केलं.

सोशल मीडियावरून जनतेशी संवाद साधताना राज ठाकरे म्हणाले, जेव्हा महाराष्ट्रावर संकट येतं तेव्हा परप्रांतीय आपल्या राज्यात परततात. आतातरी महाराष्ट्राने परप्रांतीयांवर अवलंबून राहणं थांबावं. उलट आपल्याच राज्यातील असंख्य बेरोजगार तरुणांना संधी द्या. खरं तर ज्या राज्याने तुम्हाला इतकं दिलं त्या राज्याची संकटकाळी साथ सोडून जाता कामा नये.

हेही वाचा - एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जायचंय? तुम्हाला 'अशा' पद्धतीने भरावा लागेल फाॅर्म...

दादागिरी खपवून घेणार नाही

महाराष्ट्रात मराठी बनून, इथली भाषा शिकून, इथल्या संस्कृतीशी जुळवून घेतलं तर आम्ही परप्रांतीयांना विरोध का करू? पण जर इथे तुम्ही दादागिरी करू लागलात तर आम्ही खपवून घेणार नाही.

महाराष्ट्रची प्रगती हेच महाराष्ट्रावरचं संकट ठरलं का? ५० वर्षांपूर्वी दाक्षिणात्य लोकं महाराष्ट्रात यायचे पण दक्षिणेच्या राज्यांची प्रगती झाली आणि तिथून येणाऱ्यांची संख्या घटली. आज देशाचे सर्वाधिक पंतप्रधान उत्तरप्रदेशातून निवडून येतात, पण त्या प्रदेशाचा विकास नाही होत. का?

राजकारणी कणाहीन झालेत

मऱ्हाठेशाहीने जवळपास १५० वर्ष देशावर राज्य केलं, अनेक विचारधारा मग ती कम्युनिझम ते आरएसएस पर्यंतच्या विचारधारांचा जन्म महाराष्ट्रात झाले, एका पेक्षा एक सरस नेते महाराष्ट्रातून दिल्लीत गेले, दिल्ली देखील महाराष्ट्राचं म्हणणं ऐकून घ्यायचो पण आजचे राजकारणी कणाहीन झालेत.

महाराष्ट्राची सांस्कृतिक जडणघडण महाराष्ट्र विसरलाय, आपण आपल्या भाषेकडे पण चालढकलीच्या नजरेने बघतोय, आज महाराष्ट्र भांबावला आहे असं दिसतंय. राज्यकर्त्यांनीच गुडघे टेकलेत त्यामुळे लोकं कुठे आणि कोणाकडे बघणार?

हेही वाचा - निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, यामुळे उद्धव ठाकरेंची खुर्ची वाचणार

मोफत घरांच्या योजनेमुळे लोंढे आदळले

महाराष्ट्राकडे बघितलं तर ९५ च्या आधीचा महाराष्ट्र आणि नंतरचा महाराष्ट्र अशी विभागणी करता येईल. बाळासाहेबांची झोपडपट्टीवासीयांना मोफत घरं देण्याची योजना चांगली होती पण मुंबईत फुकट घरं मिळत आहेत, कळल्यावर लोंढे आदळले आणि मराठी भाषेची आणि इथल्या सांस्कृतिक चौकटीची वीणच उसवली.

झोपडपट्टी पुनर्वसन योजना ही सरकारने स्वतःकडे घ्यावी, बिल्डरांच्या हाती देऊ नये ही गोष्ट मी गेले अनेक वर्ष सांगतोय, ह्याचा पुनर्विचार व्हायला हवं. महाराष्ट्राने कायम राज्याचा विचार न करता सर्वप्रथम देशाचा विचार केला हे चूक आहे का नाही माहित नाही. पण आता राज्याने स्वतःचा विचार आधी करायला हवा, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा