Advertisement

“राजरोसपणे खून पडायला लागल्यास महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारं नाही”

माझ्या पक्षातील सहकारी जमील शेख यांच्या हत्या प्रकरणात राष्ट्रवादीचा पदाधिकारी नजीम मुल्ला याचं नाव आलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणाची दखल घ्यावी. अशी मंडळी त्यांना सांभाळायची असतील, तर दुसऱ्यांचे हातही बांधलेले नसतात.

“राजरोसपणे खून पडायला लागल्यास महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारं नाही”
SHARES

माझ्या पक्षातील सहकारी जमील शेख यांच्या हत्या प्रकरणात राष्ट्रवादीचा पदाधिकारी नजीम मुल्ला याचं नाव आलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणाची दखल घ्यावी. अशी मंडळी त्यांना सांभाळायची असतील, तर दुसऱ्यांचे हातही बांधलेले नसतात. परंतु असे राजरोसपणे खून पडायला लागले, तर ते महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारं नाही, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी संताप व्यक्त केला. 

कबुली जबाबात नाव

राज ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जमील शेख हत्या प्रकरणावर भाष्य करत राज्य सरकारने त्याची गंभीर दखल घेण्याची मागणी केली. ते म्हणाले, माझ्या पक्षातील सहकारी जमील शेख यांची हत्या झाली. या हत्याप्रकरणाचा पोलिसांकडून उत्तर प्रदेशपर्यंत तपास करण्यात आला. यावेळी काही आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींनी दिलेल्या कबुली जबाबात ठाण्यातील राष्ट्रवादीचे (ncp) नगरसेवक नजीब मुल्लांचं नाव पुढं आलं आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी जी प्रेसनोट जारी केली आहे. त्यामध्ये नजीब मुल्ला यांनीच जमील शेख यांची हत्या करण्याची सुपारी दिल्याचं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. 

हेही वाचा- परमबीरांना पदावरून हटवल्यावरच १०० कोटींच्या टार्गेटची आठवण कशी झाली?- राज ठाकरे

दखल घ्यावी

सत्ताधारी पक्षाचे लोक दिवसाढवळ्या लोकांना मारत आहेत. याच नजीम मुल्लांचं नाव सूरज परमार बिल्डर आत्महत्या प्रकरणात आलं होतं. ती केसही रफादफा झाली. आता पुन्हा या प्रकरणात नाव आलं आहे. आता राज्य सरकार काय करतंय हे मी पाहतोय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी या प्रकरणाची दखल घ्यावी. अशी मंडळी त्यांना सांभाळायची असतील, तर दुसऱ्यांचे हातही बांधलेले नसतात. परंतु असे राजरोसपणे खून पडायला लागले, तर ते महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारं नाही. यासंबंधी मी लवकरच पवारसाहेबांची भेट घेणार आहे, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

आताच आठवण का?

दरम्यान, परमबीर सिंह यांना १०० कोटींच्या टार्गेटची आठवण पोलीस कमिशनर पदावरून हटवलं गेल्यावरच का झाली? आधी का नाही झाली? बार आणि रेस्टाॅरंटकडून १०० कोटी रुपये वसूल करण्याचं टार्गेट अनिल देशमुखांकडून दिलं गेलं हा आरोप लांच्छनास्पद आहे, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी अनिल देशमुख यांच्यावर टीका केली. 

मुकेश अंबानींच्या घराबाहेर पोलिसांनी स्फोटकं ठेवली, ती कोणी आणि कोणाच्या सांगण्यावरून ठेवली आणि का ठेवली हा मुद्दा महत्वाचा आहे. अनिल देशमुख (anil deshmukh) हा मुद्दा महत्वाचा नाही. यासंदर्भात चौकशी सुरु झाली की नंतर तुम्ही विसरुन गेलात. तुमच्या बातम्या बंद झाल्या की मग सगळेच विसरुन जाणार. त्यामुळे मूळ मुद्दा भरकटू देऊ नका, असं राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं.

हेही वाचा- महाराष्ट्रातच का वाढतोय कोरोना संसर्ग?, राज ठाकरेंनी सांगितलं नेमकं कारण

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा