Advertisement

मनसे दणका! २४ तासांत मिळाला कोळी महिलांना न्याय

राज ठाकरे यांच्या निर्देशानुसार स्थानिक मनसे विभागाध्यक्ष संजय नाईक यांना डोंगरीतील बेकायदा मासेविक्री करणाऱ्या मुजोरांना मनसेदणका दिला आणि संबंधित परिसर मोकळा केला.

मनसे दणका! २४ तासांत मिळाला कोळी महिलांना न्याय
SHARES

राजसाहेब, अनधिकृत मासेविक्रेत्यांपासून आम्हाला त्रास होतोय. त्यांचा बंदोबस्त करा', अशी कृष्णकुंजवर येऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे दाद मागणाऱ्या कोळी भगिनींना अवघ्या २४ तासांमध्ये न्याय मिळाला. (mns chief raj thackeray solve problem of women fish seller in dongri mumbai)

राज ठाकरे यांच्या निर्देशानुसार स्थानिक मनसे विभागाध्यक्ष संजय नाईक यांना डोंगरीतील बेकायदा मासेविक्री करणाऱ्या मुजोरांना मनसेदणका दिला आणि संबंधित परिसर मोकळा केला. यामुळे मासेविक्रेत्या महिलांना मोठा दिलासा मिळाला. या निमित्ताने मनसेच्या दणक्याचा प्रत्यय पुन्हा एकदा सर्वांना आला.

डोंगरी मासेविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या कोळी भगिनींनी सोमवारी कृष्णकुंज निवासस्थाना बाहेर गर्दी करून राज ठाकरे यांची भेट घेतली होती. डोंगरी मासळी बाजाराबाहेर परप्रांतीय मासेविक्रेत्यांचं मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने स्थानिक मासेविक्रेत्यांना धंद्यासाठी जागा शिल्लक नसल्याचं त्यांनी सांगितलं. एवढंच नाही, तर परप्रांतीय मासेविक्रेत्यांच्या मुजोरीमुळे कोळी बांधवांचा व्यवसाय मंदावला आहे. त्यामुळे या बेकायदा मासेविक्रेत्यांना हटवा' अशी मागणी या कोळी महिलांनी केली. त्यावर राज ठाकरे यांनी या कोळी महिलांना प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिल्यानंतर या महिला माघारी फिरल्या.

त्यानंतर राज ठाकरे यांनी मनसे विभागाध्यक्ष संजय नाईक यांना डोंगरीतील बेकायदा मासेविक्री करणाऱ्या मुजोरांना दणका देण्याचे निर्देश दिले. त्यानुसा अवघ्या २४ तासांत कायदेशीररित्या हा परिसर मोकळा करण्यात आला.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा