Advertisement

“राजसाहेब, त्या बेकायदा मासेविक्रेत्यांना हटवा”

मुंबईतील काही मासेविक्रेत्या महिलांनी सोमवारी राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत त्यांनी बेकायदा मासेविक्रेत्यांना हटवण्याची मागणी करत, वेगवेगळ्या समस्यांचं गाऱ्हाण त्यांच्यापुढं मांडलं.

“राजसाहेब, त्या बेकायदा मासेविक्रेत्यांना हटवा”
SHARES

लाॅकडाऊनमुळे संकटात सापडलेली वेगवेगळ्या पेशातील लोकं सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटून त्यांच्यापुढं आपल्या व्यथा मांडत आहे. याच तऱ्हेने मुंबईतील काही मासेविक्रेत्या महिलांनी देखील सोमवार ५ आॅक्टोबर रोजी राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत त्यांनी बेकायदा मासेविक्रेत्यांना हटवण्याची मागणी करत, वेगवेगळ्या समस्यांचं गाऱ्हाण त्यांच्यापुढं मांडलं. (fish seller womens meet mns chief raj thackeray)

राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या दादरमधील कृष्णकुंज निवासस्थानासमोर सोमवारी दुपारी महिलांची मोठी गर्दी जमली. या महिलांना राज ठाकरे यांची भेट घ्यायची होती. तशा प्रकारचा संदेश राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर राज ठाकरे या महिलांना भेटायला आले. यातील बहुतांश महिला या मुंबईतील डोंगरी परीसरात मासेविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या होत्या. 

हेही वाचा - हाथरस घटनेवर 'ते' गप्प का? राज ठाकरेंचा रोकठोक सवाल

डोंगरी मासळी बाजाराबाहेर परप्रांतीय मासेविक्रेत्यांचं मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने स्थानिक मासेविक्रेत्यांना धंद्यासाठी जागा शिल्लक नसल्याचं त्यांनी सांगितलं. एवढंच नाही, तर परप्रांतीय मासेविक्रेत्यांच्या मुजोरीमुळे कोळी बांधवांचा व्यवसाय मंदावला आहे. त्यामुळे या बेकायदा मासेविक्रेत्यांना हटवा' अशी मागणी या कोळी महिलांनी केली. त्यावर राज ठाकरे यांनी या कोळी महिलांना प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिल्यानंतर या महिला माघारी फिरल्या.

कोरोना संकट आणि लाॅकडाऊनमुळे सध्या सगळ्याच व्यवसायांना मोठा फटका बसला आहे. या काळात परप्रांतीय आपापल्या गावी निघून गेल्यावर बऱ्यापैकी गरजू स्थानिकांनी संधीचा फायदा उचलत मासे, खाद्यपदार्थ, भाजी विक्रीचा किरकोळ व्यवसाय सुरू केला आहे. परंतु आता राज्यातील बहुतांश व्यवहार सुरळीत सुरू झाल्याने परप्रांतीय देखील माघारी फिरू लागले आहेत. यामुळे काही ठिकाणी स्थानिक विरूद्ध परप्रांतीय अशी चकमक उडताना दिसत आहे.

तर दक्षिण मुंबईतील मासे विक्रेत्या महिला सातत्याने परप्रांतीय मासे विक्रेत्यांविरोधात आवाज उठवताना बघायला मिळतात. कधी मासळी बाजाराचा प्रश्न तर कधी महापालिकेकडून होणाऱ्या अन्यायाविरूद्ध त्या रस्त्यावर उतरतात. 

हेही वाचा - खासगी डाॅक्टरांचं शिष्टमंडळ राज ठाकरेंच्या भेटीला, म्हणाले…


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा