माझी ब्ल्यू प्रिंट कुणी वाचली तरी का? - राज ठाकरे

मची ब्ल्यू प्रिंट कुठं आहे? असे खोचक प्रश्न मला विचारण्यात यायचे. परंतु मी ब्ल्यू प्रिंड सादर केल्यावर ती वाचण्याची साधी तसदी देखील कुणी घेतली नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

SHARE

मी जेव्हा सांगायचो की राज्याची ब्ल्यू प्रिंट असावी, तेव्हा तुमची ब्ल्यू प्रिंट कुठं आहे? असे खोचक प्रश्न मला विचारण्यात यायचे. परंतु मी ब्ल्यू प्रिंड सादर केल्यावर ती वाचण्याची साधी तसदी देखील कुणी घेतली नाही, अशी खंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्ती केली. ते बीडमधील पत्रकार परिषदेत बोलत होते.


काय म्हणाले राज?

मनसेने जी ब्ल्यू प्रिंट बनवली, त्यात मला हव्या असलेल्या सर्व कार्यक्रमाचा समावेश आहे. अशी ब्ल्यू प्रिंट देशात देखील कुणी बनवल्याचं उदाहरण नाही. ही ब्ल्यू प्रिंट मनसेच्या संकेतस्थळावर आजही उपलब्ध आहे.

मनसेच्या ब्ल्यू प्रिंटमध्ये ज्या कार्यक्रमांचा उल्लेख आहे, त्यातील काही कार्यक्रमांवर राज्य सरकारने काम सुरू केलं असलं, तरी ती कामे पूर्ण झालेली नाहीत.


नाशिकमधील कामे लोकांसमोर

याच ब्ल्यू प्रिंटनुसार नाशिकमध्ये विकासकामे करण्यात आली आहेत. नाशिक महापालिकेत सत्ता असताना केलेली कामे आजही लोकांसमोर आहे.


भूमिपुत्रांना न्याय

माझं आंदोलन परप्रांतियांविरोधात आहे. भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत ही माझी पूर्वीपासूनची भूमिका आहे. या भूमिकेवर मी ठाम आहे.


ग्रामीण भागाचा विचार

शेतकरी आत्महत्या, हमीभाव न मिळणं, बी-बियाणांचे वाढलेले दर, देशात आणि राज्यात शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या या पाहून ग्रामीण भागातील तरूणालाही हेच वाटतं की शेतीकडे वळू नये.

त्याऐवजी नोकरी करावी याचमुळे तरुणांचा कल शहराकडे वाढत चालला आहे. शेतीबाबत बोलणं म्हणजेच मी ग्रामीण भागाचा विचार करतो असा समज कुणी करून घेऊ नये, असा टोलाही राज यांनी टीकाकरांना लगावला.हेही वाचा-

ईव्हीएमच्यानिमित्तानं पुन्हा भाऊबंदकी? राजचं उद्धवला पत्र

केबल व्यवसायावर गदा येऊ देणार नाही - राज ठाकरेसंबंधित विषय
ताज्या बातम्या