Advertisement

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींना करोनाची लागण!


मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींना करोनाची लागण!
SHARES

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. राज ठाकरेंना बरं वाटत नसल्यामुळे मुंबईत होणारा मनसे कार्यकर्ता मेळावा पुढे ढकलण्यात आला होता. मात्र, आता राज ठाकरेंना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

राज ठाकरेंना करोनाची सौम्य लक्षणं जाणवत होती. त्यांना ताप देखील आल्याची माहिती मिळत आहे. त्यांनी आणि त्यांच्या मातोश्रींनी करोनाचे दोन्ही डोस घेतले आहेत. मात्र, त्यानंतर देखील त्यांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं समोर आलं आहे. पालिकेकडून राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजवर सॅनिटायझेशन केलं जाण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर घरीच क्वारंटाईन होऊन उपचार केले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

राज ठाकरेंच्या मातोश्रींनी आज सकाळीच लीलावती रुग्णालयाला भेट दिली होती. यानंतर त्यांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं समोर आलं आहे. राज ठाकरे आणि त्यांच्या आई या दोघांना करोनाचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. मात्र, तरीदेखील त्यांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा