Advertisement

'न्यायालयाचा अवमान खटला दाखल करायची वेळ आणू नका'


'न्यायालयाचा अवमान खटला दाखल करायची वेळ आणू नका'
SHARES

'न्यायालयाचा अवमान खटला दाखल करायची वेळ आणू नका', असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापलिका आयुक्त आणि पोलिस आयुक्तांसह सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना स्मरणपत्रातून दिला आहे.


का लिहलं पत्र?

मुंबईतल्या रेल्वेस्थानक परिसरात पुन्हा फेरीवाल्यांचा वावर सुरू झाल्यामुळे राज ठाकरे यांनी महापलिका, रेल्वे आणि पोलिस यंत्रणा यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली आहे. स्थानिक माहापलिका विभागीय कार्यालये आणि पोलिस ठाण्यांना त्यांनी हे पत्र दिले आहे. पत्रासोबत त्यांनी न्यायालयाच्या आदेशाची प्रतही जोडली आहे.


काय म्हणाले राज ठाकरे?

'तुम्हाला दोषारोप करण्यासाठी हे पत्र नाही. पूर्ण व्यवस्था भ्रष्ट आहे, चुकीची आहे, असे माझे म्हणणे नाही. पण किरकोळ प्रलोभनांना बळी पडून कायद्याची चौकट मोडणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांना संरक्षण द्यायचं सोडून करदात्यांच्या हितासाठी उभे राहा', असं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.

रेल्वेस्थानक परिसर आणि पदपथ हे फेरीवाले मुक्त ठेवणं तुमचं काम आहे. न्यायालयाचेही तसे निर्णय आहेत. कायदा तुमच्या बाजूने आहे. तुम्ही जनतेचे सेवक आहात. जनतेच्या मनातलं निश्चितपणे जाणता. माझी तुम्हाला विनंती आहे की, कायद्याचे आणि न्यायालयाच्या आदेशाचे पालन करा, असंही राज ठाकरेंनी या पत्रात नमूद केलं आहे.हेही वाचा

कारवाईनंतरही फेरीवाले दिसल्यास मनसे स्टाईल दाखवू - नितीन सरदेसाई

तर, फेरीवाले आपली स्टाईल दाखवतील - शशांक राव


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा