Advertisement

गाड्यांवरील मराठी नंबर प्लेट, मनसेने ठाकरे सरकारकडे केली 'ही' मागणी

मराठी भाषेत नंबर प्लेट लावण्यास परवानगी नसेल तर तातडीने तसा कायदा करुन परवानगी द्यावी व महाराष्ट्रातच मराठी भाषिकांची होत असलेली गळचेपी थांबवावी, अशी मागणी मनसेतर्फे राज्य सरकारला करण्यात आली आहे.

गाड्यांवरील मराठी नंबर प्लेट, मनसेने ठाकरे सरकारकडे केली 'ही' मागणी
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक झालेली बघायला मिळत आहे. त्यानुसार गाड्यांवरील मराठी नंबर प्लेटवर होत असलेली कारवाई तातडीने थांबवावी. मराठी भाषेत नंबर प्लेट लावण्यास परवानगी नसेल तर तातडीने तसा कायदा करुन परवानगी द्यावी व महाराष्ट्रातच मराठी भाषिकांची होत असलेली गळचेपी थांबवावी, अशी मागणी मनसेतर्फे राज्य सरकारला करण्यात आली आहे.

मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी यासंदर्भात राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात लिहिण्यात आलं आहे की, महाराष्ट्रात विविध गाड्यांवर मराठीत नंबर प्लेट लावलेल्या आहेत. अशा गाड्यांवर आरटीओकडून कारवाई करून दंडवसुली करण्यात येत आहे. महाराष्ट्राची मातृभाषा असलेल्या मराठी भाषेतील नंबर प्लेटवर कारवाई होत असल्याने मराठी जनांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

मराठी भाषा संवर्धन आणि मराठी अस्मितेबाबत माजी परिवहन मंत्री दिवाकर रावते सभागृहात व विविध स्तरावर याबाबत आग्रही भूमिका घेताना दिसले. त्यांनीच २०१६ मध्ये वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत दुचाकीसह सर्व गाड्यांवर मराठी प्लेट लावण्याबाबत भूमिका जाहीर केली होती. परंतु आज अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली आहे की महाराष्ट्रात ‘मराठी अस्मिता’ जपणाऱ्यांवर कारवाई करून सरकार दंड वसूल करत आहे ?

हेही वाचा- ‘नो मराठी’, ‘नो अॅमेझाॅन’, मनसे पुन्हा आक्रमक

वास्तविक महाराष्ट्रात मराठी नंबर प्लेट लावण्याबाबत राज्य शासन आग्रही असलं पाहिजे होतं. तसा महाराष्ट्रात कायदाच केला पाहिजे होता. परंतु तसं न करता सरकारकडून मराठी नंबर प्लेटवर कारवाई करून सोयीस्कररित्या आपल्याच मातृभाषेची गळचेपी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा प्रकारे मराठी भाषेची सरकारकडूनच गळचेपी होत असेल, तर भाषेचं संवर्धन आणि ‘मराठी अस्मिता’ कशी जपली जाईल, असा प्रश्न निर्माण होताे.

तरी आपण याबाबत तातडीने दखल घेऊन मराठी नंबर प्लेटवर होत असलेली कारवाई तातडीने थांबवावी. मराठी भाषेत नंबर प्लेट लावण्यास परवानगी नसेल, तर तातडीने तसा कायदा करून परवानगी द्यावी व महाराष्ट्रात मराठी भाषिकांची होत असलेली गळचेपी थांबवावी, अशी मागणी राजू पाटील यांनी केली आहे. 

काही दिवसांपूर्वीच तुम्हाला महाराष्ट्रात आमची मराठी भाषा मान्य नाही, तर महाराष्ट्रात आम्हाला तुम्ही मान्य नाही, असं म्हणत राज ठाकरे यांची (raj thackeray) महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी भाषेच्या मुद्द्यावर अॅमेझाॅन या शाॅपिंग पोर्टलविरोधात पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. एवढंच नाही, तर मनसेचे उपाध्यक्ष अखिल चित्रे यांनी या मुद्द्याकडे लक्ष वेधताना राज्याचे उद्योग, खनिकर्म आणि मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांना पत्र देखील लिहिलं आहे.

(mns demands to stop action against marathi number plate on vehicle in maharashtra)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा