Advertisement

विरोधकांची टोलमाफीची मागणी


SHARES

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बाद करण्याच्या निर्णयावरुन सर्वच ठिकाणाहून राजकीय चर्चा रंगू लागल्या. टोलनाक्यावरुन प्रवास करताना वाहतूकदारांना अडचणी येऊ नयेत म्हणून राज्यातील सर्वच ठिकाणी टोलमाफी करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र तो फक्त 3 दिवसांपूरताच. मग या निर्णयाविरोधात विरोधक तरी कसे गप्प बसणार त्यांनी थेट पूर्णपणे टोलमाफी करण्याची मागणी केली. विरोधकांच्या या मागणीला आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनीही दुजोरा दिलाय. राज्यसरकानं तीन दिवसांचा टोलमाफीचा निर्णय घेतला खरा, मात्र आता विरोधकांनी केलेली कायमस्वरुपी टोलमाफी करण्याची मागणीही मोदी सरकार मान्य करेल हाच खरा प्रश्न आहे.

संबंधित विषय
Advertisement