मनसेची गुप्त बैठक

 Andheri
मनसेची गुप्त बैठक
मनसेची गुप्त बैठक
मनसेची गुप्त बैठक
मनसेची गुप्त बैठक
मनसेची गुप्त बैठक
See all

अंधेरी - पदाधिकाऱ्यांच्या अंतर्गत नाराजीमुळे मनसेनं अंधेरीमध्ये गुप्त बैठकीचे आयोजन केलं होतं. वर्सोवामध्ये विधानसभा क्षेत्रात पक्षाच्या अंगीकृत घटक पदाधिकाऱ्यांना दोन वर्षांपासून डावललं जात असल्यानं ही गुप्त बैठक घेण्यात आली. मनसे उपाध्यक्ष उमाकांत कोटणीस यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी जनहित विभाग संघटक संतोष सोनावणे, वाहतूक सेनेचे विभाग संघटक उल्हास परब तसेच शारीरिक सेनेचे विभाग अध्यक्ष संदीप बाणेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते. ओशिवरा येथील रायगडमिलिटरी शाळेच्या वाणिज्य विभाग कार्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात पदाधिकाऱ्यांनी उमाकांत कोटणीस यांच्यासमोर व्यथा मांडल्या. कार्यकर्त्यांनी आपले अंतर्गत वाद बाजूल ठेवून राज ठाकरे आणि शालिनीताई ठाकरे यांच्या आदेशानुसार पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी काम करावे अशी ताकीत कोटणीस यांनी दिली.

Loading Comments