महाराष्ट्र ही कर्मभूमी सांगणारे बाॅलिवूडवाले गेले कुठं? मनसेचा सवाल

महाराष्ट्र ही आपली कर्मभूमी आहे, असं मुलाखतींमधून सांगणारे बाॅलिवूड कलाकार महाराष्ट्र संकटात असताना कुठं गेले आहेत? असा खडा सवाल मनसे चित्रपटसेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सोशल मीडियावरून उपस्थित केला आहे.

  • महाराष्ट्र ही कर्मभूमी सांगणारे बाॅलिवूडवाले गेले कुठं? मनसेचा सवाल
SHARE

महाराष्ट्र ही आपली कर्मभूमी आहे, असं मुलाखतींमधून सांगणारे बाॅलिवूड कलाकार महाराष्ट्र संकटात असताना कुठं गेले आहेत? असा खडा सवाल मनसे चित्रपटसेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सोशल मीडियावरून उपस्थित केला आहे. 

काय म्हणाले खोपकर?

ज्या प्रेक्षकांच्या जीवावर आपल्या तुंबड्या भरतात तेच प्रेक्षक जेव्हा दु:खात आहेत तेव्हा त्यांना सावरण्यासाठी पुढे का आले नाहीत? एकमेकांच्या टुकार सिनेमांचं प्रमोशन करण्यासाठी उठसूठ व्हिडीओ बाईट पोस्ट करणारे हिरो, यांना मदतीचं आवाहन करणारा एक साधा व्हिडीओही टाकता आला नाही? असा प्रश्न खोपकर यांनी विचारला आहे.


सोबतच, संकटसमयी मराठी मनोरंजन विश्वातील कलाकार एकत्र आले आणि त्यांनी अतिशय नियोजनपूर्वक पूरग्रस्तांना मदतसामुग्री पोचवण्याची व्यवस्था केली. केवळ कलाकारच नाही तर अगदी बॅकस्टेज आर्टिस्टही पुढे आला. पुराचं पाणी ओसरु लागल्यावर आता खरं आव्हान आहे चिखल झालेले संसार सावरण्याचं... महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेनेही आर्थिक स्वरुपात असेल किंवा गायींच्या चाऱ्याच्या स्वरुपात असेल, ही मदत रवाना केलेली आहे. समस्त मराठी कलाकारांनी दाखवलेली आपुलकी आणि मनाचा मोठेपणा बघून सगळेच भारावलेत,  अशा शब्दांत खोपकर यांनी मराठी सिने इंडस्ट्रीतील कलाकारांच्या कामाचं कौतुक केलं आहे.

खोपकर यांच्या तिखट प्रतिक्रियेनंतर कुठल्या बाॅलिवूड कलाकाराला जाग येते किंवा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कोण पुढं सरसावतो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. हेही वाचा-

माणुसकीच्या नात्याने निवडणूक पुढं ढकला, राज ठाकरे यांची मागणी

‘जनाची नाही तर मनाची लाज बाळगून राजीनामा द्या’, शालिनी ठाकरेंचं महापौरांना पत्रसंबंधित विषय
ताज्या बातम्या

महाराष्ट्र ही कर्मभूमी सांगणारे बाॅलिवूडवाले गेले कुठं? मनसेचा सवाल
00:00
00:00