Advertisement

माणुसकीच्या नात्याने निवडणूक पुढं ढकला, राज ठाकरे यांची मागणी

राज्यात निवडणुकीची आचारसंहीत लागू झाली, तर पूरग्रस्तांपर्यंत मदत पोहोचवणं कठीण होईल, त्यामुळे माणुसकीच्या दृष्टीकोनातून आगामी विधानसभा निवडणूक पुढं ढकलण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.

माणुसकीच्या नात्याने निवडणूक पुढं ढकला, राज ठाकरे यांची मागणी
SHARES

पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थिती अत्यंत गंभीर आहे. पूर ओसरल्यावर कदाचित तेथील जनतेला रोगराईचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे जनजीवन सुरळीत व्हायला पुढचे २ ते ३ महिने तरी लागतील. अशा परिस्थितीत जर राज्यात निवडणुकीची आचारसंहीत लागू झाली, तर पूरग्रस्तांपर्यंत मदत पोहोचवणं कठीण होईल, त्यामुळे माणुसकीच्या दृष्टीकोनातून आगामी विधानसभा निवडणूक पुढं ढकलण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यातील लाखो लोकांना पूरामुळे घरं सोडावी लागली आहेत. हिच परिस्थिती राज्यातील इतर पूरग्रस्त भागातही आहे. त्यांना खाण्यासाठी अन्नधान्य देखील नाही. तसंच पुराचं पाणी ओसरल्यावर परिसरात रोगराईचा फैलाव होऊ शकतो. सर्व परिस्थिती सावरायला पुढचे २ ते ३ महिने लागू शकतात. हे एवढं सोपं नाही. या परिस्थितीत पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचं काम जलदगतीने व्हायला हवं. त्यांना तातडीने वैद्यकीय मदत मिळायला हवी.

हेही वाचा- बळी निसर्गाचे की सरकारी अनास्थेचे?

पत्र लिहिणार

परंतु आॅक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक आहे. त्याआधी आचारसंहीता लागू झाल्यास पूरग्रस्तांपर्यंत सरकारी मदत पोहोचवण्यास अडचणी येतील आणि सरकारही आपले हात वर करेल. यामुळे विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याची माझी मागणी आहे. केंद्र सरकारनं देखील या परिस्थितीचा गांभीर्यानं विचार करायला हवा. त्यासाठी आपण लवकरच निवडणूक आयोगाला पत्र देखील लिहिणार आहोत, असं म्हणणं राज यांनी मांडलं. 

हेही वाचा- ‘जनाची नाही तर मनाची लाज बाळगून राजीनामा द्या’, शालिनी ठाकरेंचं महापौरांना पत्र

सत्तेचा माज

पूरस्थिती हाताळण्यासाठी सरकारने आधीच हा भाग लष्कराच्या ताब्यात द्यायला हवा होता. पण हे सर्व नेते यात्रांमध्ये गुंग होते. भाजपला सत्तेचा माज आलाय. त्यांना कशाशीही काही घेणंदेणं नाही. त्यांना फक्त राजकारण करायचं आहे. कुठे, किती जागा निवडून येतील, असा अंदाज लावणाऱ्यांना किती पाऊस पडला तर किती पाणी भरेल, याचा अंदाज कसा काय आला नाही. फक्त पक्षप्रवेश करत बसायचे आणि जनतेच्या गरजांकडे दुर्लक्ष करायचं, असं म्हणत राज यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना टोला हाणला. 

सोबतच पूरग्रस्त भागात मनसेचे स्थानिक कार्यकर्ते पक्षाचा लेबल न लावताच काम करत असल्याचं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांचं कौतुक केलं.



हेही वाचा-

निवडणुकीत फसवणूक होणार असेल तर मतदान कशासाठी? - राज ठाकरे

कलम ३७० व ३५ अ काय होतं? जाणून घ्या...



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा