Advertisement

महाराष्ट्रात बाळासाहेबानंतर एकच ब्रँड…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट शाखेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी राज ठाकरेंना साद घालणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांना टोला हाणला आहे.

महाराष्ट्रात बाळासाहेबानंतर एकच ब्रँड…
SHARES

सगळीकडून कोंडीत सापडलात म्हणून लगेच तुम्हाला ‘ठाकरे ब्रँड’चं कसं होणार? अशी चिंता वाटत असली, तरी ती तुमच्यापर्यंतच ठेवा. मनसैनिकांना राज ठाकरे यांच्या ब्रँडबद्दल, त्यांच्या लोकप्रियतेबद्दल कधीही शंका नव्हती आणि भविष्यातही असणार नाही, असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट शाखेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी राज ठाकरेंना साद घालणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांना टोला हाणला आहे. (mns leader amey khopkar reply sanjay raut to his appeal to raj thackeray)

शॅडो संपादक महाशय, अगदी रोकठोकपणे सांगायचं तर महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर फायरब्रँड एकच… राजसाहेब ठाकरे. सगळीकडून कोंडीत सापडलात म्हणून लगेच तुम्हाला ठाकरे ब्रँडचं कसं होणार? अशी चिंता वाटत असली, तरी ती तुमच्यापर्यंतच ठेवा.  मनसैनिकांना राज ठाकरे यांच्या ब्रँडबद्दल, त्यांच्या लोकप्रियतेबद्दल कधीही शंका नव्हती आणि भविष्यातही असणार नाही. तुम्ही तुमचा स्वामिभान गुंडाळून ठेवलाय. पण त्यात आमच्या राजसाहेबांना खेचू नका. एक मात्र खरं, आज तुमचा लेख सगळीकडे व्हायरल झालाय, तो राजसाहेबांच्या उल्लेखामुळेच, हे ध्यानात असू द्या, असं अमेय खोपकर यांनी संजय राऊत यांना सुनावलं आहे.

हेही वाचा - 'ब्रँड' राज ठाकरेंना राऊतांची साद

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनात लिहिलेल्या लेखात भूमिका मांडताना संजय राऊत यांनी कंगना रणौतसोबतच्या वादात राज ठाकरे यांना खेचण्याचा प्रयत्न केला. आपल्या लेखात त्यांनी लिहिलंय की, ‘ठाकरे’ हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रॅण्ड आहे. दुसरा महत्त्वाचा ‘ब्रॅण्ड’ पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रॅण्डनाच नष्ट करायचं व त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा उघडं पडलं आहे. राज ठाकरे हेसुद्धा त्याच ‘ब्रॅण्ड’चे एक घटक आहेत व या सगळ्याचा फटका भविष्यात त्यांनाही बसणार आहे. शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात, पण शेवटी महाराष्ट्रात ‘ठाकरे’ ब्रॅण्डचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ‘ठाकरे’ ब्रॅण्डचं पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचं पतन व्हायला सुरुवात होईल.

एक नटी मुंबईत बसून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध एकेरी भाषेत बोलते. आव्हानाची भाषा करते व त्यावर महाराष्ट्राच्या जनतेने काहीच प्रतिक्रिया द्यायची नाही हे कसले एकतर्फी स्वातंत्र्य? तिच्या बेकायदेशीर बांधकामावर हातोडा पडला तेव्हा हे तर माझे राममंदिरच होतं, असा कांगावा तिने केला. पण हे बेकायदेशीर बांधकाम तिने कायद्याचे उल्लंघन करून ती सांगत असलेल्या ‘पाकिस्ताना’त बांधलं.  

 मुंबईचं महत्त्व फक्त ओरबाडण्यासाठी व पैसे कमवण्यासाठीच आहे. मग मुंबईवर कोणी रोज बलात्कार केला तरी चालेल. या सगळ्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे, ‘ठाकरे’ यांच्या हाती महाराष्ट्राची सूत्रे आहेत. त्यामुळे रस्त्यावर उतरून मराठी अस्मितेसाठी राडे करण्याची आज गरज नाही. महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचं भाग्यचक्र मुंबईभोवतीच फिरत आहे. मुंबई देशाची असेल नाहीतर जगाची, पण तिच्यावर पहिला हक्क महाराष्ट्राचा आहे. जेव्हा जेव्हा मुंबईला डिवचलं तेव्हा तेव्हा महाराष्ट्राने प्रतिकार केला. यात काही चुकत असेल तर पंतप्रधान मोदी यांनीच सांगावे!, असं म्हणत पंतप्रधानांना देखील प्रश्न विचारला आहे.

हेही वाचा - समाजात तणाव निर्माण होऊ न देणं हे विरोधकांचही कर्तव्य- संजय राऊत

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा