Advertisement

मनसे नेते अविनाश जाधव यांना जामीन मंजूर

ठाण्यातील बाळकूम येथील कोव्हिड रुग्णालयासमोर परिचारिकांच्या प्रश्नावर आंदोलन केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

मनसे नेते अविनाश जाधव यांना जामीन मंजूर
SHARES

ठाण्यातील बाळकूम येथील कोव्हिड रुग्णालयासमोर परिचारिकांच्या प्रश्नावर आंदोलन केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी जाधव यांना अटक झाली होती. (mns leader avinash jadhav gets bail from thane court)

कोरोनाच्या काळात ठाणे महापालिकेने काही परिचारिकांना नियुक्त केलं होतं. त्यानंतर या परिचारिकांवर ठेकेदाराच्या माध्यमातून काम करण्यासाठी दबाव आणला जात होता. तर काही परिचारिकांना कामावरून कमी करण्यात आलं होतं. या परिचारिकांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने अविनाश जाधव आणि मनसैनिकांनी हे आंदोलन केलं होतं. अटक झाल्यानंतर जाधव यांनी ठाणे दिवाणी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, पोलिसांनी अधिक वेळ मागितल्यानं त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर पुढील सुनावणीत दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने जाधव यांना जामीन मंजूर केला.

हेही वाचा - अविनाश, मै हू ना! राज ठाकरेंचा एवढाच निरोपच पुरेसा…

याप्रश्नी ठाणे महापालिकेसमोर आंदोलन करत असतानाच वसई-विरार महापालिकेतील आंदोलनाप्रकरणी अविनाश जाधव यांना तडीपारीची नोटीसही बजावण्यात आली होती. मुंबई, ठाणे, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई आणि रायगड अशा ५ जिल्ह्यांमधून २ वर्षांसाठी तडीपार होण्यासाठी ही नोटीस बजावण्यात आली.

ही नोटीस नसून आपण केलेल्या कामाचं सरकारने दिलेलं बक्षीस असल्याची प्रतिक्रिया अविनाश जाधव यांनी दिली होती. या नोटिशीवरून ठाण्यातील राजकारण तापलेलं असताना खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाधव यांना आलेल्या नोटिशीची दखल घेतली. एवढंच नाही, तर त्यांना खास निरोप देखील पाठवला होता.

संबंधित विषय
Advertisement